1 February Rule Changes 2025: १ फेब्रुवारी २०२५ पासून काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. हे बदल थेट तुमच्या दैनंदिन खर्चावर परिणाम करू शकतात. यामध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरांपासून यूपीआय व्यवहार, कारच्या किंमती, बँकिंग नियम आणि हवाई इंधन दरांचा समावेश आहे. जाणून घ्या सविस्तर!
१) एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल
प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला इंधन कंपन्या एलपीजी गॅसच्या किंमतीत सुधारणा करतात. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या दिवशी सिलिंडरच्या दरात वाढ होणार की कपात होणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष असेल. जानेवारीमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली होती, त्यामुळे फेब्रुवारीमध्ये गृहवापरासाठीच्या सिलिंडरच्या दरातही बदल होण्याची शक्यता आहे.
२) यूपीआय व्यवहारांसाठी नवीन नियम लागू
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने यूपीआय व्यवहारांबाबत नवीन नियम लागू केले आहेत. १ फेब्रुवारीपासून स्पेशल कॅरेक्टर (जसे की @, #, $) असलेल्या यूपीआय ट्रान्झॅक्शन आयडीद्वारे व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत. फक्त अल्फान्यूमेरिक (अक्षरे आणि अंक) ट्रान्झॅक्शन आयडी वैध असतील. त्यामुळे ग्राहकांनी हे बदल लक्षात घेऊन व्यवहार करणे गरजेचे आहे.
३) मारुतीच्या कारच्या किंमतीत वाढ
मारुती सुझुकी इंडियाने १ फेब्रुवारीपासून त्यांच्या अनेक मॉडेल्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे ही किंमत वाढ ३२,५०० रुपयांपर्यंत जाऊ शकते. ऑल्टो K10, स्विफ्ट, ब्रेझा, बलेनो, डिझायर, अर्टिगा यांसारख्या लोकप्रिय कारच्या किंमतीवर हा बदल होणार आहे.
४) बँकिंग नियमांमध्ये बदल
कोटक महिंद्रा बँकेने १ फेब्रुवारीपासून बँकिंग सेवांसाठी नवे शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये मोफत एटीएम व्यवहारांच्या मर्यादेत बदल होणार असून, काही सेवांसाठीचे शुल्क वाढवले जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी हे नवे नियम समजून घेणे आवश्यक आहे.
५) हवाई इंधन (ATF) दर बदलण्याची शक्यता
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला विमान इंधनाच्या (Air Turbine Fuel – ATF) दरात सुधारणा केली जाते. त्यामुळे १ फेब्रुवारीला हवाई इंधन महाग होणार की स्वस्त, हे पाहण महत्त्वाच ठरेल. जर दर वाढले, तर त्याचा थेट परिणाम विमान तिकिटांच्या किमतींवर होईल.
तुमच्या खिशावर परिणाम!
या सर्व बदलांचा परिणाम तुमच्या दैनंदिन खर्चावर होऊ शकतो. त्यामुळे १ फेब्रुवारीपूर्वी या अपडेट्स जाणून घ्या आणि आर्थिक नियोजन करा.
🔴 हेही वाचा 👉 फेब्रुवारीतच महिलांना मिळणार १५०० ऐवजी २१०० रुपये? जाणून घ्या सविस्तर.