8th Pay Commission Salary Delay Government Staff : भारत सरकार आणि राज्य सरकारच्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतनवाढ मिळवण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना कमीत कमी एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे.
वित्तीय वर्ष 2025-26 चे बजेट आणि आठव्या वेतन आयोगास विलंब
भारत सरकारने 2025-26 साठी संसदेत सादर केलेले बजेट (Budget 2025) तपासले असता, आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी कोणताही निधी प्रस्तावित केलेला नाहीत. हे लक्षात घेतल्यास, आठव्या वेतन आयोगाच्या रिपोर्टला मंजुरी मिळण्यासाठी आणखी एक वर्ष लागू शकते. याचा अर्थ, वेतनवाढीस अधिकृत मंजुरी 2026 च्या वित्तीय वर्षातच मिळेल.
वित्त मंत्रालयाने डिफेन्स, होम, आणि कार्मिक विभागांना पत्र पाठवून आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) कामासाठी आवश्यक टर्म ऑफ रिफरन्सवर त्यांचे प्रस्ताव मागवले आहेत. या प्रस्तावांच्या मंजुरीनंतरच वेतन आयोगाच्या कामाला सुरुवात होईल.
सातव्या वेतन आयोगाचा अनुभव
सातव्या वेतन आयोगाचा रिपोर्ट सादर करण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळ घेतला होता. त्यानुसार, आठव्या वेतन आयोगाचा रिपोर्ट सादर होण्यासाठी देखील 2026 पर्यंत वेळ लागू शकतो.
यामुळे, सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळवण्यासाठी अजून एक वर्ष थांबावे लागणार आहे.