Gold Rate Drop 2025 Economic Survey Prediction: सोन्याच्या किमतीत गेल्या आठवड्यात मोठी वाढ झाल्यानंतर आता त्यात घसरण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. इकोनॉमिक सर्वे 2024-25 (Economic Survey 2024-25) च्या अहवालानुसार, 2025 मध्ये सोन्याच्या किमतीत मोठी घट होऊ शकते, तर चांदीच्या किमतीत वाढ होण्याचा अंदाज आहे.
सोन्याच्या किमतींमध्ये वाढ, पण 2025 मध्ये मोठी घसरण शक्य!
Gold Price Prediction 2025 : गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत तब्बल ₹2070 ची वाढ, तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात ₹1900 ची वाढ झाली आहे. 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतरही सोन्याच्या दरात कोणतीही मोठी घट दिसली नाही. मात्र, (Gold Price Forecast) इकोनॉमिक सर्वे 2024-25 मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की 2025 मध्ये सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात, त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध राहणे गरजेचे आहे.
देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (2 फेब्रुवारी 2025)
- दिल्ली – 24 कॅरेट: ₹84,640 | 22 कॅरेट: ₹77,600
- मुंबई, कोलकाता, हैदराबाद – 24 कॅरेट: ₹84,490 | 22 कॅरेट: ₹77,450
- अहमदाबाद, भोपाळ – 24 कॅरेट: ₹84,540 | 22 कॅरेट: ₹77,500
- चेन्नई – 24 कॅरेट: ₹84,490 | 22 कॅरेट: ₹77,450
- लखनऊ, जयपूर, चंदीगड – 24 कॅरेट: ₹84,640 | 22 कॅरेट: ₹77,600
🔴 लेटेस्ट अपडेट 👉 बजेटनंतर दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचा सोन्याचा दर 2 फेब्रुवारी 2025.
चांदीच्या दरात मोठी वाढ!
सोन्याचे दर स्थिर राहिले असले तरी चांदीच्या दरात मोठी तेजी दिसून आली आहे. 2 फेब्रुवारी 2025 रोजी चांदी ₹99,500 प्रति किलोवर पोहोचली आहे, गेल्या आठवड्यात चांदीत ₹2000 ची वाढ झाली आहे.
सोन्याच्या किमती का घसरणार?
इकोनॉमिक सर्वे 2024-25 च्या अहवालात 2025 मध्ये सोन्याच्या किमती घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या ‘कमोडिटी मार्केट आउटलुक’ अहवालानुसार, 2025 मध्ये कमोडिटी बाजारात 5.1% घसरण होण्याची शक्यता आहे, तर 2026 मध्ये 1.7% घसरण होऊ शकते.
🔴 हेही वाचा 👉 २१०० रुपये हफ्त्याचा निर्णय कधी? अजित पवारांनी दिले महत्त्वाचे संकेत.
गुंतवणूकदारांसाठी काय करावे?
जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) करण्याचा विचार करत असाल, तर सध्याच्या उच्च किमतींवर खरेदी करण्याआधी 2025 मधील घसरणीच्या शक्यतेचा विचार करा. तसेच, चांदीच्या वाढत्या किमती पाहता, भविष्यातील गुंतवणुकीसाठी चांदी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
🔥 ट्रेंडिंग 🔥
- Gold Price Today : सोन्याचा आजचा भाव 20 फेब्रुवारी 2025
- Gold Rate Today : मोठ्या घसरणीनंतर सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, जाणून घ्या सोन्याचा आजचा दर 17 फेब्रुवारी 2025
- लाडकी बहीण योजनेबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा खुलासा! Ladki Bahin Yojana Chandrashekhar Bawankule
- Ladki Bahin Yojana: आता लाडक्या बहिणींना दरवर्षी द्यावी लागणार ही कागदपत्र
- Gold Price Today : सोन्याचा आजचा भाव १७ फेब्रुवारी २०२५