मुंबई : Anganwadi Sevika Bharti 2025 Maharashtra – राज्यातील महिला आणि बालविकास विभागाकडून लवकरच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती 2025 प्रक्रिया सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या उद्दिष्ट्यानुसार ही भरती राबवली जाणार आहे. (Anganwadi Sevika Bharti 2025: Maharashtra govt to start recruitment for Anganwadi Sevika & Helper posts. 12th pass women).
भरती पात्रता आणि प्रक्रिया
- बारावी उत्तीर्ण महिलांना अर्ज करण्याची संधी.
- ऑगस्ट 2022 पूर्वी नियुक्त मदतनीस दहावी उत्तीर्ण असतील, तर त्यांना थेट सेविका पदावर नियुक्ती मिळणार.
- रिक्त पदांसाठी लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार.
- ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी स्थानिक ग्रामपंचायत आणि शहरी भागातील उमेदवारांसाठी संपूर्ण महापालिका क्षेत्र ग्राह्य धरले जाणार.
- निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा नाही, फक्त गुणांच्या आधारे निवड होईल.
163 कोटींच्या निधीला मंजुरी
राज्य सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या थकबाकी मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यासाठी 163.43 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांची थकबाकी लवकरच मिळणार आहे.
महिलांसाठी सुवर्णसंधी
राज्यातील महिलांसाठी ही मोठी संधी असून, अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात लवकरच जाहीर होईल. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेची वाट पाहावी.
🔴 हेही याचा 👉 अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पडताळणी, ‘या’ महिलांना आता मिळणार नाही फेब्रुवारीचा हफ्ता.