Ayushman Card Application Process : आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना असून, तिच्या माध्यमातून करोडो भारतीयांना मोफत उपचार मिळत आहेत. या योजनेद्वारे पात्र व्यक्तींना आयुष्मान कार्ड दिल जात, ज्याच्या मदतीने त्यांना सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार घेता येतात. या कार्डचा वापर करून ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळू शकतात.
कुणाच बनू शकत आयुष्मान कार्ड?
आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी काही पात्रता निकष आहेत. ते खालील प्रमाणे:
- निराश्रित आणि आदिवासी लोक
- अनुसूचित जाती व जमातीतील लोक
- दिव्यांग व्यक्ती असलेले कुटुंब
- ग्रामीण भागातील रहिवासी
- दिहाडी मजुर आणि असंघटित क्षेत्रातील कामगार
आयुष्मान कार्ड कस बनवाव?
१. ऑफलाइन पद्धत:
- सर्वप्रथम, आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
- अधिकारी आपली पात्रता तपासून, कागदपत्रे पडताळतील.
- सर्व काही योग्य असल्यास, तुमचा आयुष्मान कार्डसाठी अर्ज करतील आणि काही दिवसात तुम्हाला कार्ड मिळेल.
२. ऑनलाइन पद्धत:
- तुम्ही आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आयुष्मान कार्डसाठी अर्ज करू शकता.
- ऑनलाइन अर्ज केल्यावर, तुमच कार्ड तुमच्या ईमेलवर किंवा वेबसाईटवर त्वरित उपलब्ध होईल.
आयुष्मान कार्ड मिळविल्यानंतर, तुम्हाला सरकारकडून दरवर्षी ५ लाख रुपये पर्यंतचे मोफत उपचार मिळू शकतात. हे कार्ड सरकारी तसेच योजनेंतर्गत नोंद असलेल्या रुग्णालयांमध्ये वापरता येईल.
आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana 2025) नागरिकांच्या जीवनात सुधारणा आणत असून, या योजनेंतर्गत मिळणारे फायदे नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहेत. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर लगेच अर्ज करा आणि मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्या.
🔴 हेही वाचा 👉 चुकीची माहिती देणाऱ्या महिलांवर होणार कारवाई? अदिती तटकरे यांच मोठ विधान.