बांधकाम कामगारांसाठी नवीन नियम लागू, सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आदेश Bandhkam Kamgar Yojana News

2 Min Read
Bandhkam Kamgar Yojana Biometric Verification Starts

Bandhkam Kamgar Yojana Biometric Verification Starts : महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आता ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. त्यांची बायोमेट्रिक व कागदपत्रे पडताळणी जिल्हा किंवा तालुका सुविधा केंद्रावरच होईल.

बांधकाम कामगारांसाठी नवीन नियम लागू

Bandhkam Kamgar Yojana New Update : राज्यातील सर्व बांधकाम कामगारांसाठी नवीन सुविधा ५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू करण्यात आली आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर (Akash Fundkar) यांनी ही माहिती दिली. यासाठी ३६६ तालुका सुविधा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

नोंदणी व लाभ वाटप प्रक्रिया अधिक सोपी

कामगार नोंदणी, नुतनीकरण आणि लाभ वाटपासाठी ‘IWBMS’ ही संगणकीय प्रणाली कार्यरत आहे. पूर्वी हे काम जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्रावर होत होते. आता प्रत्येक तालुका केंद्रावर दररोज १५० अर्ज प्रक्रिया केली जाईल.

कामगारांसाठी मोठी सुविधा

  • ऑनलाईन अर्ज भरता येईल, पण पडताळणी केंद्रावरच करावी लागेल.
  • तालुका सुविधा केंद्रावर कामगारांना सोयीच्या तारखेला हजेरी लावता येईल.
  • जिल्हा मुख्यालय असलेल्या तालुक्यात अतिरिक्त सुविधा केंद्र सुरू होणार.

५ लाखांहून अधिक अर्जांची प्रक्रिया पूर्ण

८ नोव्हेंबर २०२४ पासून सुविधा केंद्रे कार्यान्वित झाली. आतापर्यंत ५.१२ लाख अर्ज ऑनलाईन हाताळण्यात आले आहेत. काही ठिकाणी मोठ्या गर्दीमुळे अडचणी येत होत्या. त्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी सुधारित सूचना देण्यात आल्या आहेत.

कामगारांसाठी महत्त्वाचे बदल

  • जिल्हा केंद्रावरील उशिराची तारीख रद्द करून जवळच्या तालुका केंद्रावर तातडीची तारीख मिळणार.
  • प्रत्येक जिल्हा सुविधा केंद्रावर ५ कर्मचारी असतील.
  • ३ एंट्री ऑपरेटर नोंदणी प्रक्रिया सांभाळतील.
  • २ डाटा एंट्री ऑपरेटर कामगारांच्या तपशिल बदलाचे काम करतील.

🔴 हेही वाचा 👉 मिळवा दरमहा ५ हजार रुपये पेन्शन, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

३१ मार्च २०२५ पूर्वी सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आदेश

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले की, सर्व प्रलंबित अर्ज ३१ मार्च २०२५ पूर्वी निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी मंडळ स्तरावर समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

बांधकाम कामगारांनी आपल्या सोयीप्रमाणे तालुका सुविधा केंद्रावर जाऊन (Bandhkam Kamgar Yojana Maharashtra) प्रक्रिया पूर्ण करावी. यामुळे वेळेची बचत होईल आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ होईल.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे 1500 सोडून अजून दरमहा 1500 रुपये मिळवा.

Share This Article