Bangladeshi Woman Arrested Mazi Ladki Bahin Yojana Scam Mumbai: मुंबईतून बांगलादेशी नागरिकांना बाहेर काढण्याच्या मोहिमेला वेग आला असतानाच, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतही (Mazi Ladki Bahin Yojana Scam) बांगलादेशी महिलांनी गैरप्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी पाच बांगलादेशी नागरिकांसह एका दलालाला अटक केली आहे.
बांगलादेशी महिलेला मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ
दक्षिण मुंबईच्या कमाठीपुरा भागात राहणाऱ्या एका बांगलादेशी महिलेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करून आर्थिक लाभ घेतल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना मोठा गैरप्रकार उघड केला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
सरकारची कारवाई आणि
सरकारकडे अनेक अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपात्र महिलांनी स्वतःहुन लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा, असे आवाहन केले होते. त्यांनी वसुलीबाबत स्पष्ट केले होते की, स्वतःहुन लाभ सोडल्यास मिळालेल्या रकमेची वसुली केली जाणार नाही.
🔴 हेही वाचा 👉 अपात्र महिलांकडून पैसे वसूल करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले.
लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याचे वितरण
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा लाभ दिला जातो. अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता 24 जानेवारी रोजी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. आणि 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे 1,500 रुपये जमा होतील.
🔴 हेही वाचा 👉 जानेवारी २०२५ सन्मान निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा.
कमाठीपुरा भागातील गैरप्रकार
पोलिस तपासात कमाठीपुरा भागातील बांगलादेशी महिलांनी योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. बांगलादेशी महिलांसोबत एका दलालालाही अटक करण्यात आली असून, या प्रकरणामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार दुसऱ्या मोफत गॅस सिलिंडरचा लाभ.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेचा गैरलाभ घेतला जाऊ नये यासाठी सरकारने कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. तरच राज्यातील खऱ्या गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.