Bank of Maharashtra Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही, उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत एकूण 172 पदे भरली जाणार आहेत.
भरतीसाठी पदसंख्या आणि पगार
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये स्केल II ते स्केल VII या स्तरांवर विविध पदांसाठी भरती होत आहे. पदांनुसार पगार खालीलप्रमाणे आहे:
पदनाम | पगार श्रेणी (रुपये) |
---|---|
स्केल II | ₹64,820 – ₹93,960 |
स्केल III | ₹85,920 – ₹1,05,280 |
स्केल IV | ₹1,02,300 – ₹1,20,940 |
स्केल VII | ₹1,56,500 – ₹1,73,860 |
भरती कोणत्या पदांसाठी आहे?
- जनरल मॅनेजर
- डेप्युटी जनरल मॅनेजर
- असिस्टंट जनरल मॅनेजर
- सिनियर मॅनेजर
- इतर स्पेशलिस्ट ऑफिसर पदे
भरतीसाठी आवश्यक पात्रता
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
- वयोमर्यादा 22 ते 55 वर्षे आहे.
- शैक्षणिक पात्रता संबंधित पदानुसार आहे, अधिकृत सूचना पाहणे आवश्यक.
- उमेदवारांकडे आवश्यक तांत्रिक कौशल्य आणि अनुभव असावा.
निवड प्रक्रिया
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये (Bank Job Without Exam) या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. उमेदवारांना मुलाखतीत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे निवडले जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया?
- अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वर जा.
- “Recruitment” विभाग उघडा आणि “Specialist Officers Recruitment 2025” निवडा.
- अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती भरून संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
🔹 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करा.
भरतीसंबंधी सर्व अटी, शर्ती आणि शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.