Ladki Bahin Yojana: ‘ही’ योजना बंद करू नका, काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी, सरकारसमोर मोठ आव्हान

2 Min Read
Because Of Ladki Bahin Yojana Shivbhojan Thali Closure Congress Demand

Because Of Ladki Bahin Yojana Shivbhojan Thali Closure Congress Demand : राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या खर्चाच्या कारणाने शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या विचारात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी शिवभोजन योजना बंद करू नये, अशी मागणी केली आहे. गरीब आणि गरजू लोकांसाठी असलेली ही योजना अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवभोजन थाळी गरीबांसाठी महत्त्वाची – विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “शिवभोजन थाळीमुळे गरिबांना केवळ 10 रुपयांत चांगले अन्न मिळते. मात्र, सरकार माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mazi Ladki Bahin Yojana) जाहिरातींवर पैसे उधळत आहे आणि दुसरीकडे गरीबांसाठीची ही योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे अन्यायकारक आहे.” त्यांनी सरकारला ही योजना सुरू ठेवण्याची मागणी केली.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेतून 1 रुपयाही न मिळालेल्या महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय.

धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा – वडेट्टीवार यांची मागणी

कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या खात्यात घोटाळे झाल्याचा आरोप झाला आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “पूर्वी अशा प्रकरणांमध्ये आयुक्त आणि सचिवांची बदली करण्यात आली होती. मग आता सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाही? सरकारची अशी कोणती मजबुरी आहे?”

वडेट्टीवार म्हणाले, जर महायुती सरकारला आपली प्रतिष्ठा वाचवायची असेल, तर धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा.

सोयाबीन खरेदीचा कोटा वाढवावा – काँग्रेसचा इशारा

सोयाबीन खरेदीचा शेवटचा दिवस असल्याने बाजारात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारकडून सोयाबीन खरेदीचा कोटा वाढवण्याची मागणी केली.

ते म्हणाले, “शेतकऱ्यांकडे असलेले संपूर्ण सोयाबीन सरकारने खरेदी करावे. सरकारने योग्य दर दिला नाही, तर आम्ही शेतकऱ्यांसोबत आंदोलन करू. सगळा सोयाबीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ठेऊन सरकारला जाग आणू.”

सरकारसमोर मोठ आव्हान

शिवभोजन थाळी योजना सुरू ठेवावी, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा आणि सोयाबीन खरेदीसाठी ठोस पावले उचलावीत, अशा तीन मोठ्या मागण्या काँग्रेसने केल्या आहेत. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

🔴 हेही वाचा 👉 अर्ज पडताळणीमुळे महिलांमध्ये चिंता, बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात.

Share This Article