Budget 2025 : एससी-एसटी महिलांसाठी नवीन योजना, पाच लाख महिलांना होणार फायदा

3 Min Read
Budget 2025 SC ST Women Entrepreneurs Loan Scheme

Budget 2025 SC ST Women Entrepreneurs Loan Scheme | १ फेब्रुवारी २०२५ – केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला सशक्तीकरणासाठी मोठी घोषणा केली आहे. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) गटातील पहिल्यांदाच उद्योग सुरू करणाऱ्या महिलांसाठी सरकारने (SC ST Women Entrepreneurs Loan Scheme) नवीन कर्ज योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पुढील पाच वर्षांत या महिला उद्योजकांना २ कोटी रुपयांपर्यंत टर्म लोन उपलब्ध करून दिले जाईल.

महिला उद्योजकांसाठी विशेष कर्ज योजना

महिला सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करणाऱ्या पाच लाख एससी-एसटी महिला उद्योजकांना मोठे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. हे कर्ज महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करेल.

सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0’ योजनेत मोठा बदल

अर्थसंकल्प २०२५ मध्ये गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० योजनेच्या माध्यमातून ८ कोटी महिलांना पोषण आहार पुरवला जाणार आहे.

महिलांची आर्थिक प्रगती आणि बँकिंग सहभाग

पीआयबीच्या अहवालानुसार, सध्या भारतातील कामगार वर्गातील महिलांचा सहभाग दर ४१% आहे, जो जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने महिलांचे आर्थिक सबलीकरण करण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत. देशातील एकूण २५२ कोटी बँक खात्यांपैकी ३६.४% म्हणजेच ९१ कोटी खाती महिलांच्या नावावर आहेत.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींसाठी बजेट 2025 मध्ये महत्वाच्या घोषणा: कौशल्य, कर्ज आणि पोषणासाठी.

एमएसएमई क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) देखील अर्थसंकल्पात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. सरकारने SME आणि मोठ्या उद्योगांसाठी नवीन मॅन्युफॅक्चरिंग मिशन सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच, कामगारप्रधान क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवली जाणार आहेत.

  • कर्ज हमी कव्हर: MSME साठी कर्ज हमी ‘कव्हर’ २० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.
  • गॅरंटी शुल्क: पूर्वीच्या तुलनेत गॅरंटी शुल्क १% पर्यंत कमी करण्यात आले आहे.
  • नवीन राष्ट्रीय संस्था: बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था स्थापन केली जाणार आहे.

महिला सशक्तीकरणाला गती देणारा अर्थसंकल्प

अर्थसंकल्प २०२५ मधील हे निर्णय महिला उद्योजकांसाठी संधीचे नवे दार उघडतील. लघु उद्योगांना मदत, वित्तपुरवठा आणि अंगणवाडी योजनांमध्ये सुधारणा यामुळे महिलांच्या आर्थिक स्थैर्यात वाढ होईल.

🔴 हेही वाचा 👉 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे 5 मोठे निर्णय; सर्वसामान्यांना मिळणार थेट फायदा.

Share This Article