Women Budget 2025: लाडक्या बहिणींसाठी बजेट 2025 मध्ये महत्वाच्या घोषणा: कौशल्य, कर्ज आणि पोषणासाठी

2 Min Read
Budget 2025 Women Announcements Schemes Skill Loan Nutrition

Union Budget 2025: केंद्रीय बजेट 2025 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महिलांसाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि विकासासाठी सरकारने ठरवलेल्या या योजना आगामी काळात महिलांसाठी मोठा बदल घडवून आणतील.

महिलांसाठी महत्वाच्या घोषणा:

  1. लघुउद्योजक महिलांसाठी कर्ज:
    महिलांना नव्याने लघुउद्योग सुरू करण्यासाठी दोन कोटी रुपयांचे कर्ज दिले जाईल. यामुळे महिलांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य मिळेल.
  2. कौशल्य विकास प्रशिक्षण:
    महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे महिलांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल.
  3. मागास वर्गातील महिलांसाठी योजना:
    चामड्याच्या चपला बनवणाऱ्या महिलांसाठी एक विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे, ज्यामुळे पाच लाख महिलांना या योजनेचा लाभ होईल.
  4. स्टार्टअपसाठी मदत:
    महिलांसाठी स्टार्टअप सुरू करण्यासाठी सरकार 2 कोटी रुपयांची मदत देईल. यामुळे महिला उद्योजकांना आपले व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक संसाधने मिळतील.
  5. इंडिया पोस्ट महिला बँक पुनरुज्जीवित:
    भारतातील महिलांसाठी पोस्ट बँकेला पुनरुज्जीवित करण्यात येईल, ज्यामुळे महिलांना आर्थिक सेवा सहज उपलब्ध होईल.
  6. अंगणवाडी आणि पोषण योजना:
    सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजने अंतर्गत 8 कोटी लहान मुलांना पोषणमूल्य मिळवून देण्यासाठी अतिरिक्त निधी दिला जाईल. तसेच, गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी पोषणाच्या सुविधा पुरवल्या जातील.
  7. ग्रामीण महिलांसाठी कौशल्य विकास:
    विशेषत: ग्रामीण महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम चालवले जातील, ज्यामुळे त्यांना उपजीविकेसाठी नवीन पर्याय मिळतील.

🔴 हेही वाचा 👉 अपात्र लाडक्या बहिणींची तक्रार नोंदवण्यासाठी मोबाईल ॲप; त्वरित कारवाईची हमी.

एससी/एसटी महिलांसाठी 10 हजार कोटींचा निधी:


एससी आणि एसटी महिलांसाठी 5 वर्षांसाठी कर्ज योजना सुरू केली जाणार आहे. या योजनेंतर्गत 5 लाख महिलांना कर्ज मिळणार आहे, ज्यामुळे त्यांना रोजगार मिळवण्यास मदत होईल.

पोषणासाठी अतिरिक्त निधी:


पोषण मूल्य पुरवण्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद केली आहे. याअंतर्गत 1 कोटी महिलांना आणि 20 लाख कुपोषित मुलींना पोषणमूल्य पुरवले जाईल.

Share This Article