CISF Bharti 2025: 10वी पाससाठी भरतीची सुवर्णसंधी, 1100 हून अधिक जागा, संपूर्ण माहिती जाणून घ्या!

2 Min Read
CISF Constable Driver Recruitment 2025 Apply Online

Sarkari Naukri, CISF Constable Recruitment 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये भरतीची सुवर्णसंधी! CISF भरती 2025 अंतर्गत काँस्टेबल/ड्रायव्हर आणि काँस्टेबल/ ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर पदांसाठी 1124 जागा निघाल्या आहेत. या भरतीसाठी 3 फेब्रुवारी ते 4 मार्च 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

CISF Recruitment 2025 | भरतीचा तपशील:

  • एकूण पदे: 1124
  • काँस्टेबल/ड्रायव्हर: 845
  • काँस्टेबल/ ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर: 279
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन (cisfrectt.cisf.gov.in)
  • शेवटची तारीख: 4 मार्च 2025

शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक अर्हता:

  • 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • उमेदवारांकडे हेवी मोटर व्हेईकल (HMV) / ट्रान्सपोर्ट व्हेईकल / लाईट मोटर व्हेईकल (LMV) / मोटारसायकल गिअर यापैकी कोणतेही परवाना असणे आवश्यक.
  • किमान 3 वर्षांचा HMV ड्रायव्हिंग अनुभव असावा.
  • ही भरती फक्त पुरुष उमेदवारांसाठी आहे.

वयोमर्यादा:

  • किमान वय: 21 वर्षे
  • कमाल वय: 27 वर्षे (4 मार्च 2025 नुसार गणना)
  • आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट लागू.

शारीरिक पात्रता:

  • उंची: 167 सेमी
  • छाती: 80-85 सेमी
  • 800 मीटर धावणे: 3 मिनिटे 14 सेकंदात पूर्ण करावे लागेल.
  • लाँग जंप: 11 फूट
  • हाय जंप: 3 फूट 6 इंच

CISF Recruitment 2025 निवड प्रक्रिया:

  1. लेखी परीक्षा
  2. शारीरिक चाचणी (PET & PST)
  3. कागदपत्र तपासणी (DV)
  4. मेडिकल टेस्ट

पगार:

निवड झालेल्या उमेदवारांना ₹21,700 ते ₹69,100 पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.

CISF मध्ये सरकारी नोकरीची संधी!

जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या (Sarkari Naukri 2025) शोधात असाल, तर CISF मध्ये भरती होण्याची ही उत्तम संधी आहे. अर्ज करण्यासाठी cisfrectt.cisf.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि 4 मार्चपूर्वी अर्ज करा!

🔴 नोकरी 👉 १०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात नोकरीची संधी, मासिक वेतन ₹१९,९००/- त्वरित अर्ज करा.

Share This Article