Gold Price Hike Reasons Gold Investment Tips 2025 : सोन्याच्या किमतीत मोठी तेजी दिसून येत आहे. सोन्याच्या दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि गुंतवणूकदारांचा कल. अमेरिकन अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि जागतिक बाजारातील घडामोडी यामुळे सोने सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जात आहे. शेअर बाजारात घसरण होत असल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आहेत.
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्याने भारतीय बाजारात सोन्याचा परतावा अधिक आहे. गेल्या काही महिन्यांत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने सोन्याच्या किमतीत (Gold Rate) वाढ झाली. त्यामुळे भारतात सोन्याची गुंतवणूक अधिक फायद्याची ठरत आहे.
सोन का आहे सुरक्षित गुंतवणूक?
गेल्या अनेक शतकांपासून सोन मूल्यवान मानल जात आहे. कोणत्याही आर्थिक संकटाच्या काळात गुंतवणूकदार सोन्याला प्राधान्य देतात. हे “लिंडी इफेक्ट” म्हणून ओळखले जाते, ज्याचा अर्थ जितका जुना पर्याय तितकाच तो टिकून राहण्याची शक्यता जास्त असते.
सध्या सोन्यात गुंतवणूक करावी का?
सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) करण्याआधी गुंतवणूकदारांनी पोर्टफोलियो डायव्हर्सिफिकेशनचा (Portfolio Diversification) विचार करावा. सध्याची तेजी किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सोन्याच्या वाढत्या किमती (Gold Rates) पाहून गुंतवणुकीचा त्वरित निर्णय घेण्याआधी सर्व पर्यायांचा विचार करणे गरजेचे आहे.
🔴 हेही वाचा 👉 सोन्याचा आजचा भाव १४ फेब्रुवारी २०२५.
सोन्यातील ही तेजी (Gold Trend 2025) पुढेही कायम राहील का, याबाबत तज्ज्ञांचे मत वेगवेगळे आहे. त्यामुळे कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे.