Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण! पुढे काय वाढून ठेवलय? | Gold Price Today in Marathi

3 Min Read
Gold Price Today Update Gold Rate Drop 12 February 2025

Gold Price Today Update Gold Rate Drop 12 February 2025 : 12 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळाली. काही आठवड्यांत प्रचंड वाढ झाल्यानंतर, आता सोने रेकॉर्ड उच्चांकावरून घसरले आहे. जागतिक बाजारात सोने 2,895.38 डॉलर प्रति औंस वर आले, जे 11 फेब्रुवारी रोजी 2,942 डॉलर प्रति औंस होते. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांच्या व्याजदरासंदर्भातील विधानामुळे ही घसरण झाली आहे. (Gold prices drop from record highs! On February 12, 2025, gold fell to $2,895/oz. Know why prices are down and if it’s the right time to invest in gold).

🔴 लेटेस्ट अपडेट 👉 सोन्याचा आजचा भाव (13 फेब्रुवारी 2025).

भारतामध्ये सोने स्वस्त झाले!

भारतीय बाजारातही सोन्याच्या किमतीत नरमी पाहायला मिळाली. MCX वायदा बाजारात सोने 499 रुपयांनी (0.58%) घसरून 85,024 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.

  • मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 710 रुपयांनी घसरून 86,670 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांचा आक्रोश! आमच्यावर अन्याय का?.

अमेरिकन महागाईचा सोन्याच्या किमतीवर परिणाम

11 फेब्रुवारीला फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीची शक्यता फेटाळली. मात्र, 12 फेब्रुवारी रोजी अमेरिकेतील महागाईचा डेटा जाहीर होणार आहे.

  • जर महागाई कमी झाली, तर भविष्यात व्याजदर कपात होऊ शकते आणि याचा सोन्याच्या दरावर सकारात्मक परिणाम होईल.
  • पण जर महागाई वाढली, तर फेड व्याजदर कपात करणार नाही आणि यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव येईल.

आता सोने खरेदी करावे का?

सोन्याचे दर सध्या घसरले असले, तरी दिर्घकालीन दृष्टिकोन सकारात्मक आहे. तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारात सोन्याचा दर लवकरच 3,000 डॉलर प्रति औंस ओलांडू शकतो.

  • गोल्ड ETF किंवा म्युच्युअल फंडद्वारे गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
  • एकत्र रक्कम गुंतवता येत नसेल, तर SIP च्या माध्यमातून सोने खरेदी करणे चांगला पर्याय ठरेल.
  • ज्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये अद्याप सोने नाही, त्यांनी दर घसरल्यावर खरेदी करावी.

सोन्याच्या किमतीच पुढे काय होणार?

तज्ज्ञांच्या मते, सोने दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. अमेरिकन अर्थव्यवस्था, व्याजदर धोरण, जागतिक राजकीय स्थिती आणि डॉलरचे मूल्य हे घटक सोन्याच्या किंमती ठरवतील. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करताना हे सर्व घटक लक्षात घ्यावेत.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजना नवीन अपडेट! आता या महिलांना मिळणार दरमहा फक्त 500 रुपये, शासन निर्णयात स्पष्ट.

Share This Article