Gold Rate Today : मोठ्या घसरणीनंतर सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, जाणून घ्या सोन्याचा आजचा दर 17 फेब्रुवारी 2025

2 Min Read
Gold Rate Today 17 Feb 2025 Recovery After Drop

Gold Rate Today 17 Feb 2025 Recovery After Drop : आज 17 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी सोन्याचा दर 1.6% ने घसरला होता, परंतु आज सोन्यात तेजी आली आहे. मार्केट एनालिस्ट्सनुसार, सोन्यातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.

17 फेब्रुवारी रोजी एमसीएक्सवर सोन्याचा दर 359 रुपयांनी वाढून सोन्याचा दर 85,037 रुपये प्रति 10 ग्रामवर पोहचला आहे.

मार्केट एनालिस्ट्सनुसार, सोन्याचा आउटलुक पॉझिटिव आहे. जर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ पॉलिसीमुळे असमाधानजनक स्थिती कायम राहिली, तर सोन 3,000 डॉलर प्रति औंस पार करू शकत. 2025 मध्ये सोन्याचा परतावा 10% पेक्षा जास्त राहिला आहे, जो शेअर्स आणि बिटकॉइनच्या परताव्यापेक्षा अधिक आहे.

सोन्याच्या दर वाढीमागच कारण?

अमेरिकेच्या टॅरिफ पॉलिसीवर बाजाराच लक्ष केंद्रित आहे. 1 एप्रिलपासून ते लागू होऊ शकत, ज्यामुळ ट्रेड वॉर वाढू शकत आणि महागाईत आणखीन वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते कारण सोन हे एक सुरक्षित गुंतवणूक मानल जात.

एक्सपर्ट्स नुसार, गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन असण आवश्यक आहे. ज्यांनी सोन्यात गुंतवणूक केलेली नाही, ते आता सोन्यात गुंतवणूक करू शकतात. मात्र, सोन्यात एकदाच मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा हळूहळू गुंतवणूक करण योग्य ठरेल. टप्प्याटप्प्याने थोड्या-थोड्या प्रमाणात सोन खरेदी करण फायदेशीर ठरेल.

🔴 हेही वाचा 👉 आता लाडक्या बहिणींना दरवर्षी द्यावी लागणार ही कागदपत्र.

Share This Article