Gold Storage Top Countries India Ranking : सोन एक महत्त्वाचा आर्थिक घटक आहे, जो जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेचा आधार बनलेला आहे. सोने केवळ महागाईला तोंड देण्यासाठी महत्त्वाच नसून संकटाच्या काळात अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यासाठीही सोन्याचा वापर होतो. कोणत्या देशांकडे सर्वाधिक सोन्याचा साठा (Gold Reserves) आहे आणि भारत या यादीत कितव्या स्थानावर आहे (Gold Storage In India) ते जाणून घेऊयात…
अमेरिका
सर्वाधिक सोन्याचा साठा असलेला देश अमेरिका कडे आहे. अमेरिकेने डॉलरच्या जागतिक वापराला प्रोत्साहन दिल असलं तरी, तिच आर्थिक रक्षण सोन करत आहे. फोर्ट नॉक्स आणि इतर सरकारी तिजोरीत जमा केलेल ८,१३३.४६ टन सोन हीच अमेरिकेची मोठी आर्थिक ताकद आहे.
जर्मनी
दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीने आपली आर्थिक पुनर्निर्मिती केली आणि त्यासाठी सोन्याचा साठा महत्त्वाचा ठरला. जर्मनीकडे सध्या ३,३५१.५३ टन सोन आहे, ज्यामुळे जर्मनीची आर्थिक स्थिरता टिकून राहते.
इटली
इटली हे युरोपातील एक प्रमुख व्यापारी केंद्र असून, सोन ही इटलीच्या समृद्धीची ओळख आहे. बँक ऑफ इटली मध्ये जमा केलेल २,४५१.८४ टन सोन इटलीच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं ठरत.
फ्रान्स
फ्रान्सला आपला सोन्याचा साठा जास्तीत जास्त ठेवायचा आहे. २,४३६.९७ टन सोन बँक ऑफ फ्रान्समध्ये साठवलेल असून, हा साठा फ्रान्सच्या आर्थिक सुदृढतेसाठी महत्त्वाचा आहे.
रशिया
युक्रेन युद्धानंतर रशियाने आपल्या सोन्याच्या साठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. रशियन सेंट्रल बँकेत असलेल २,३३५.८५ टन सोन रशियाच आर्थिक सामर्थ्य दर्शवत.
चीन
चीन, जी जगातील दुसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता आहे, चीनने आपल डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोन खरेदी केल आहे. चीनने पीपल्स बँक ऑफ चायनाच्या तिजोरीत २,२६४.३२ टन सोन जमा केल आहे.
भारत
भारताकडे ८४०.७६ टन सोन आहे, जे आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाच मानल जात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तिजोरीत हे सोन ठेवण्यात आल आहे.
🔴 हेही वाचा 👉 2025 मध्ये सोन्याची किंमत वाढेल की कमी होईल? WGC चा अचूक अंदाज.
नेदरलँड्स, तुर्की आणि इतर देशांतील सोन्याचा साठा
नेदरलँड्स आणि तुर्कीही आपला सोन्याचा साठा वाढवत आहेत. प्रत्येक देशाचा सोन्याचा साठा त्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी खूप महत्वाचा आहे.
सोनं देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी आणि भविष्यातील अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी महत्त्वाच आहे. अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स, रशिया आणि चीन यांसारख्या देशांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा केला आहे. भारतानेही आपल्या सोन्याच्या साठ्याची वाढ केली आहे, आणि भविष्यात हा साठा आणखी वाढू शकतो.
🔴 हेही वाचा 👉 सोन्या-चांदीचा आजचा दर 5 फेब्रुवारी 2025.