Google Chrome Security Warning India: गुगल क्रोम वापरकर्त्यांसाठी भारत सरकारचा महत्त्वाचा इशारा!

2 Min Read
Google Chrome Security Warning India

14 फेब्रुवारी 2025: Google Chrome Security Warning India – गुगल क्रोम वापरणाऱ्यांसाठी भारत सरकारने गंभीर इशारा दिला आहे. कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने एक बुलेटिन जारी करून क्रोम ब्राउझरमध्ये काही गंभीर सुरक्षा त्रुटी आढळल्याची माहिती दिली आहे. यामुळे तुमचा वैयक्तिक डेटा हॅक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कोणत्या वापरकर्त्यांना धोका?

हा इशारा Windows, Mac आणि Linux वापरणाऱ्या सर्व गुगल क्रोम (Google Chrome) वापरकर्त्यांसाठी आहे. Chrome च्या जुन्या व्हर्जनमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे हॅकर्स सहजपणे तुमच्या डिव्हाइसवर हल्ला करू शकतात.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय!.

त्रुटींचा वापर कसा केला जाऊ शकतो?

गुगल क्रोममधील Extension API, Skia आणि V8 या घटकांमध्ये सुरक्षा उणीवा आहेत. या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स तुमच्या डिव्हाइसवर अज्ञात वेबपेजद्वारे प्रवेश करू शकतात. यामुळे खालील प्रकारची हानी होऊ शकते:

  • वैयक्तिक डेटा चोरी
  • बँक खाते रिकामे होण्याची शक्यता
  • ओळख चोरी (Identity Theft)
  • डिव्हाइसवर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा धोका

काय करावे?

CERT-In ने सुचवले आहे की, Chrome ब्राउझर त्वरित अपडेट करा. नवीनतम सुरक्षित आवृत्ती ही 133.0.6943.53/54 (Windows/Mac) आणि 133.0.6943.53 (Linux) आहे. जर तुमच्या ब्राउझरला नवीन अपडेट उपलब्ध नसेल, तर लवकरच मिळेल. तोपर्यंत कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.

क्रोम अपडेट कस कराव?

  1. Chrome ब्राउझर उघडा.
  2. तीन ठिपक्यांवर (⋮) क्लिक करा.
  3. Settings > About Chrome वर जा.
  4. Chrome आपोआप अपडेट होईल.
  5. ब्राउझर रीस्टार्ट करा.

सावध राहा, सुरक्षित राहा!

जर तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल, तर (Google Chrome Security Warning) हा इशारा दुर्लक्षित करू नका. ब्राउझर अपडेट ठेवा आणि कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी काळजी घ्या. सरकारच्या सुरक्षा सूचनांचे पालन करा आणि सायबर हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण करा.

🔴 हेही वाचा 👉 मिळवा दरमहा ५ हजार रुपये पेन्शन, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

Share This Article