Sarkari Naukri: IOCL भरती 2025, परीक्षा नाही, मुलाखत नाही! इंडियन ऑइलमध्ये थेट सरकारी नोकरीची संधी

2 Min Read
IOCL Recruitment 2025 No Exam No Interview Direct Job At Indian Oil

IOCL Recruitment 2025 No Exam No Interview Direct Job At Indian Oil : सरकारी नोकरीच्या (Sarkari Naukri) शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. ही नोकरी कोणत्याही परीक्षेशिवाय आणि मुलाखतीशिवाय मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांना 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

कोणत्या पदांसाठी भरती?

IOCL मध्ये ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी भरती होत आहे.

🔹 एकूण जागा – 456
🔹 भरती क्षेत्र – दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंड

शैक्षणिक पात्रता


➡ ट्रेड अप्रेंटिस – दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र आवश्यक.
➡ टेक्निशियन अप्रेंटिस – संबंधित शाखेतील तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक.
➡ ग्रॅज्युएट अप्रेंटिस – BBA, BA, B.Com किंवा B.Sc पदवी आवश्यक.

वयोमर्यादा

✅ उमेदवारांचे वय 18 ते 24 वर्षे असावे.
✅ राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयात सवलत दिली जाणार आहे.

निवड प्रक्रिया

📌 कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत नाही!
📌 उमेदवारांची निवड शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे.
📌 या अप्रेंटिसशिपचा कालावधी 12 महिने असणार आहे.

अर्ज कसा करावा?

📌 इच्छुक उमेदवारांनी 13 फेब्रुवारी 2025 पूर्वी अर्ज करावा.
📌 अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट https://nr.ioclmd.in/ ला भेट द्या.

✔ IOCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✔ कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत नाही
✔ फक्त गुणवत्तेच्या आधारे निवड होणार
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 फेब्रुवारी 2025

🔴 नोकरीं 👉 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती 2025, राज्यातील महिलांसाठी अंगणवाडी सेविका बनण्याची मोठी संधी.

Share This Article