Kanyadan Yojana Maharashtra 2025: मुलींच्या लग्नासाठी होणारा प्रचंड खर्च कमी करणे आणि गरीब कुटुंबांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कन्यादान योजना सुरू केली आहे. सामूहिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना मदतीचा हात देणारी ही योजना, लग्नसमारंभातील खर्चाची बचत करण्याबरोबरच संसारोपयोगी साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देते.
कन्यादान योजनेची वैशिष्ट्ये:
- संस्था व दाम्पत्यांना अनुदान:
सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना प्रति दाम्पत्य 4,000 रुपये, तर प्रत्येक दाम्पत्याला 20,000 रुपयांचे अनुदान दिले जाते. - विवाह खर्चात बचत:
सामूहिक सोहळ्यात विवाह केल्याने जेवणावळी, मंडप खर्च कमी होतो, ज्यामुळे गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळतो. - संसारोपयोगी साहित्य खरेदीसाठी मदत:
दाम्पत्यांना संसार सुरू करण्यासाठी आवश्यक वस्तू खरेदीसाठी शासकीय आर्थिक सहाय्य दिले जाते.
कन्यादान योजनेसाठी पात्रता | Kanyadan Yojana Eligibility:
- वधू-वरांचे वय कायदेशीर चौकटीत असावे.
- दोघांचेही पालकांनी दिलेले लेखी संमतीपत्र आवश्यक.
- सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणारी संस्था ही नोंदणीकृत असावी.
गरीब कुटुंबांना दिलासा:
Kanyadan Yojana In Marathi: मुलीच्या लग्नाचा भार कमी करण्यासाठी ही योजना गरीब कुटुंबांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. वाढत्या महागाईच्या काळात गरीब कुटुंबांना या योजनेमुळे मोठा आधार मिळत आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह केल्याने विवाहाचा खर्च वाचत असल्याने मुलीचे लग्न थाटात पार पडते, शिवाय शासनाची मदत संसारासाठी उपयोगी ठरते.
शासनाचे आवाहन:
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत संस्थांनी पुढे यावे आणि अधिकाधिक दाम्पत्यांनी कन्यादान योजनेचा (Kanyadan Yojana Maharashtra) लाभ घ्यावा.
🔴 हेही वाचा 👉 Free Silai Machine Yojana Maharashtra.