लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट जाणून घ्या | Ladki Bahin Yojana 2100 Installment Date Maharashtra

2 Min Read
Ladki Bahin Yojana 2100 Installment Date Maharashtra

Ladki Bahin Yojana 2100 Installment Date Maharashtra: महिला कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) राज्यातील करोडो महिलांसाठी मोठी आर्थिक मदत ठरली आहे. याअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत दरमहा 1500 रुपये मिळत होते. मात्र विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार ही 1500 रुपयांची रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. निवडणूक होऊन राज्यात नवीन सरकार स्थापन झाल परंतु, अद्याप हफ्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही, या वाढीव हप्त्यासाठी महिलांना प्रतिक्षा करावी लागत आहे.

जानेवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल

Ladki Bahin Yojana January Installment Date Maharashtra: सूत्रांच्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप दिला गेलेला नाही. मकर संक्रांतीच्या आधी हा हप्ता देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, मात्र अद्याप हफ्ता जमा झाला नाही. महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे कधी जमा होणार याबाबत कोणतीही घोषणा अद्याप झाली नाही, ज्यामुळे महिलांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

🔥 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार?.

2100 रुपये कधीपासून मिळणार?

Ladki Bahin Yojana 2100 Rs: जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे की मार्च महिन्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल आणि त्यानंतरच महिलांना वाढीव रक्कम (Ladki Bahin Yojana 2100 Rupees) मिळण्यास सुरुवात होईल. तोपर्यंत महिलांना दरमहा 1500 रुपयांप्रमाणे हफ्ता मिळेल अस राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

आतापर्यंत किती महिलांना मिळाला लाभ?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै ते डिसेंबर या कालावधीत पात्र महिलांच्या खात्यात 9,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. राज्यभरातील सुमारे 2.5 कोटी महिलांनी या योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र, अपात्र महिलांची नावे कमी केल्यानंतर लाभार्थी महिलांची संख्या कमी होईल.

महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी लाडकी बहीण योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. योजनेच्या सुधारित अंमलबजावणीसाठी महिलांनी मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष ठेवावे.

Share This Article