Ladki Bahin Yojana 30 Lakh Women Apatra News Clarification Aditi Tatkare : राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून राबवली जाते. लाडकी बहीण योजनेचा राज्यातील गरजू महिलांना दरमहा १५०० रुपयांचा निधी देणे आहे. जुलै २०२४ पासून सुरू झालेल्या या योजनेने अनेक महिलांना सहारा दिला आहे.
सद्यस्थितीत, एका वृत्तात म्हटले गेले होते की, ३० लाख महिलांना आता माझी लाडकी बहीण योजनेचा (Mazi Ladki Bahin Yojana) लाभ मिळणार नाही आणि त्या अपात्र ठरतील. परंतु, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या वृत्ताला नकार दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ज्या महिलांच्या खात्यात लाभ जमा केला गेला आहे, तो परत घेतला जाणार नाही. याविषयी काही अफवा पसरवल्या जात आहेत, आणि त्या खोट्या असल्याचे त्यांनी सांगितले.
अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही महिलेच्या खात्यातून दिलेले पैसे परत घेण्याचा कोणताही विचार नाही. याव्यतिरिक्त, काही महिलांनी स्वयंस्फूर्तीन लाभ सोडण्याबाबत अर्ज केले आहेत, आणि त्या अर्जांचे निवारण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.
जानेवारी २०२५ मध्ये या योजनेअंतर्गत २.४१ कोटी महिलांना लाभ वितरित करण्यात आला. २४ जानेवारी आणि २५ जानेवारी रोजी १.१० कोटी आणि १.३१ कोटी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हफ्ता जमा केला गेला.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांच मोठ वक्तव्य – ‘त्या’ महिलांबाबत होणार वेगळा विचार.
अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अखंडतेचि पुष्टी केली असून, महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अदिती तटकरे यांनी केले आहे.
🔴 हेही वाचा 👉 सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या सोन्याची आजची किंमत.