मुंबई: ४ फेब्रुवारी २०२५ – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अनेक अपात्र महिलांना लाभ मिळाल्याचे उघड झाल्यानंतर सरकारने यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी फसवणूक करणाऱ्या महिलांवर कारवाई सुरु केली असून, अर्जांची काटेकोर पडताळणी करून योग्य महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येईल अस सरकारकडून जाहीर होताच राज्यातील हजारो महिलांनी आपले अर्ज मागे घेण्यास सुरुवात केली आहे.
लाडकी बहीण योजनेचा उद्देश गरजू महिलांना आर्थिक सहाय्य देण्याचा होता. मात्र, अनेक सधन कुटुंबातील महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला. जास्त उत्पन्न असतानाही खोटी माहिती देऊन अर्ज केला आणि योजनेचा लाभ घेतला.
माझी लाडकी बहीण योजनेचा (Mazi Ladki Bahin Yojana) लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी जाहीर केल्यानंतर, हजारो महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे महिलांना भीती वाटत आहे की, आत्तापर्यंत मिळालेले पैसे परत द्यावे लागतील, फसवणूक केल्याबद्दल कायदेशीर कारवाई केली जाईल. या भीतीपोटी महिलांनी आपले अर्ज मागे घेतले.
विशेषत: ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन आहे, तरीही त्यांनी अर्ज सादर केले होते. अशा अनेक महिला आता सरकारच्या कारवाईच्या भीतीने अर्ज मागे घेत आहेत.
🔴 हेही वाचा 👉 मुंबईतील 22 हजार महिलांचे अर्ज बाद? अर्ज पुन्हा सबमिट करण्याची संधी मिळणार.