Majhi Ladki Bahin Yojana Latest Update: लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांची पात्रतेसाठी पाच ठराविक निकषांवर आधारित छाननी होणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी जाहीर केले आहे.
मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थींना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याचा गैरवापर थांबवण्यासाठी अर्जांची तपासणी करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी जाहीर केले आहे. पात्रतेसाठी पाच ठराविक निकषांवर आधारित ही छाननी होणार असून, अनधिकृत लाभ घेणाऱ्या अर्जदारांचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत.
तक्रारींनंतर छाननीचा निर्णय
Ladki Bahin Yojana Beneficiary Verification Maharashtra 2025: राज्यात वर्धा, पालघर, यवतमाळ आणि नांदेड यासह अनेक जिल्ह्यांतून योजनेच्या गैरवापराबाबत तक्रारी येत होत्या. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी सरकारने अर्जांची तपासणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्ज बाद करण्याचे निकष
तटकरे यांनी स्पष्ट केले की, लाभार्थ्यांची पात्रता खालील पाच महत्त्वाच्या निकषांवर तपासली जाणार आहे:
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त असणे.
- घरातील कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन असणे.
- शासकीय नोकरीत असूनही योजनेचा लाभ घेतला जाणे.
- इतर शासकीय योजनांचा लाभ घेतलेला असणे.
- विवाहानंतर परराज्यात गेलेल्या लाभार्थींची पात्रता.
आकडेवारी आणि छाननी प्रक्रिया
सरकारने प्राप्तिकर विभाग व परिवहन विभागाकडून संबंधित लाभार्थ्यांची माहिती मागवली आहे. तक्रारींचे निराकरण केल्यानंतरच पात्रता निश्चित होणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
2.41 कोटी महिलांना मिळाला योजनेचा लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) आतापर्यंत 2.78 कोटी अर्जांपैकी 2.47 कोटी अर्ज पात्र ठरले आहेत. यातील 2.41 कोटी महिलांना थेट लाभ देण्यात आला असून, जानेवारी महिन्याच्या हप्त्याचा निधी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
🔴 हेही वाचा 👉 लेकीच्या लग्नाची चिंता सोडा! कन्यादान योजना आहे मदतीला.
योजनेचा वार्षिक खर्च आणि प्रभाव
महायुती सरकारने जुलै 2024 मध्ये सुरू केलेल्या या योजनेवर वर्षाला 46,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार आहे. त्यामुळे इतर योजनांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
अदिती तटकरे यांचे आवाहन
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकार सर्व अर्जांची सखोल तपासणी करून योग्य निर्णय घेणार आहे. आणि या तपासणी प्रक्रियेमुळे नियमात बसत असणाऱ्या पात्र महिलांना कोणताही त्रास होणार नाही, त्यांना इथून पुढचे हफ्ते वेळेवर मिळत राहतील. ही तपासणी केवळ खोटी माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना वगळण्यासाठी आहे.
🔴 हेही वाचा 👉 आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करा, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया.