अर्ज पडताळणीमुळे महिलांमध्ये चिंता, बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात Ladki Bahin Yojana Eligibility Verification Controversy

2 Min Read
Ladki Bahin Yojana Eligibility Verification Controversy

Ladki Bahin Yojana Eligibility Verification Controversy : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अर्ज पडताळणी प्रक्रिया सुरू झाल्याने राज्यातील अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांमध्ये चिंता वाढली आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

माजी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सरकारवर टीका केली आहे. बच्चू कडू म्हणाले, “ही योजना लाडक्या बहिणींसाठी नव्हती, तर सत्ता मिळवण्यासाठी होती.” सरकारने निवडणुकीपूर्वी कोणतीही चाचपणी न करता करोडो महिलांच्या खात्यात पैसे टाकले. आता मात्र नियम सांगून त्यांचे पैसे बंद केले जात आहेत. याला त्यांनी “फसवणूक” म्हटले आहे.

बच्चू कडू पुढे म्हणाले, “महिलांना आधी पात्र ठरवले असते, तर आज त्यांना अपात्र ठरवण्याची वेळ आली नसती. सरकारने मोठा गुन्हा केला आहे. फसवणूक झालेल्या महिलांनी आता रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारला पाहिजे.”

चारचाकी गाडी असलेल्या महिलांना अपात्र ठरवले जाणार

राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, ज्या महिलांच्या नावावर चारचाकी गाडी आहे, त्या या योजनेसाठी अपात्र ठरतील. पुण्यात येत्या सोमवारपासून तपासणी सुरू होणार आहे.

जिल्ह्यातील 75 हजारांहून अधिक महिलांच्या घरी चारचाकी गाडी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांचे अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. कारवाईच्या भीतीने यापूर्वी 8 महिलांनी पैसे परत केले होते. आता आणखी 30 महिलांनी पैसे परत करण्याची तयारी दाखवली आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहिन योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार? या महिलांच्या खात्यातच येणार पैसे.

विरोधकांचा आरोप – सरकारने मतांसाठी योजना आणली

विरोधकांनी सरकारवर, निवडणुकीपूर्वी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. “नेत्यांच्या खिशातून पैसे न जाता, सरकारी तिजोरीतून निधी वाटण्यात आला. यामागे केवळ मत मिळवण्याचा उद्देश होता,” असे बच्चू कडू म्हणाले.

माझी लाडकी बहीण योजनेतून (Mazi Ladki Bahin Yojana) अपात्र ठरवल्या जाणाऱ्या महिलांमध्ये नाराजी आहे. विरोधकही सरकारला धारेवर धरत आहेत. पुढील काही दिवसांत सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेतून 1 रुपयाही न मिळालेल्या महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय.

Share This Article