Ladki Bahin Yojana Fake Beneficiaries: लाडकी बहीण योजनेच्या अर्जदारांची कडक छाननी, फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई

2 Min Read
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Fake Beneficiaries Action

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Fake Beneficiaries Action : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या योग्य अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत. या योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी यासंदर्भात ताज्या ट्विटमध्ये योजनेसंबंधी सरकारच्या ठोस भूमिकेची माहिती दिली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून, 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमह्या १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत सध्या दोन कोटींपेक्षा अधिक महिलांनी लाभ मिळत आहे. परंतु, काही महिलांनी चुकीची माहिती देऊन योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. त्यात महाराष्ट्रा बाहेरील राज्यातील महिलांसह काही बांगलादेशी महिलांचाही समावेश आहे.

सरकारने त्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी तपास सुरू केला आहे. अदिती तटकरेंनी ट्विटमध्ये सांगितले की, बनावट अर्जदारांची छाननी अगदी कडक केली जात आहे. “पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्या बनावट अर्जदारांना एकदाही सन्मान निधी वितरित केलेला नाही,” असे अदिती तटकरेंनी स्पष्ट केले. तसेच, फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्व अर्जदारांची सखोल छाननी सुरू आहे. सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारची फसवणूक खपवून घेणार नाही, यासाठी सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी सजग आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Majhi Ladki Bahin Yojana) महिलांसाठी एक महत्त्वाची पाऊल आहे, ज्यामुळे पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळते. सरकारच्या या योजनेसाठी योग्य प्रक्रियेचा वापर करून महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्याची खात्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

🔴 हेही वाचा 👉 अपात्र लाडक्या बहिणींची तक्रार नोंदवण्यासाठी मोबाईल ॲप; त्वरित कारवाईची हमी.

Share This Article