Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेवर नाना पटोले यांचा गंभीर आरोप, राज्य सरकारला घेरल!

2 Min Read
Ladki Bahin Yojana Fake Beneficiaries Nana Patole Allegations

Ladki Bahin Yojana Fake Beneficiaries Nana Patole Allegations : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोठा दावा केला आहे. पटोले म्हणाले की,लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील महिलांव्यतिरिक्त इतर राज्यांतील तसेच बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतला आहे.”

लाडकी बहीण योजनेवर वादग्रस्त दावे!

राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्य मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर ही योजना प्रचारात आणली होती.

महायुती सरकारवर आरोपांचा भडिमार

नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

  • “सोयाबीन, कापूस, कांदा आणि दुग्ध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत, बेरोजगारी शिखरावर आहे. मात्र, सरकार या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे.”
  • “बीडच्या सरपंच हत्येच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय आरोपी असल्याने सरकारवर अधिक संशय आहे.”
  • “निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवरही पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप पटोले यांनी केला.”

🔴 हेही वाचा 👉 1 फेब्रुवारी पासून सोन्याच्या किमती वाढणार? जाणून घ्या यामागच नेमक कारण.

सरकारची भूमिका स्पष्ट होणार का?

लाडकी बहीण योजनेवरील (Ladki Bahin Yojana) आरोप, मंत्र्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न आणि काँग्रेसमधील अंतर्गत हालचाली यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता महायुती सरकारकडून या आरोपांना काय उत्तर मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत? काय करावे….

Share This Article