चारचाकी असलेल्या लाडक्या बहिणी अपात्र, पण दुचाकी असणाऱ्यांच काय? Ladki Bahin Yojana Four Wheeler Rule Two Wheeler Debate

2 Min Read
Ladki Bahin Yojana Four Wheeler Rule Two Wheeler Debate

Ladki Bahin Yojana Four Wheeler Rule Two Wheeler Debate : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नव्याने तपासणी मोहीम सुरू केली आहे. कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ग्रामीण भागातून आता नवा प्रश्न समोर येत आहे – दुचाकी असलेल्या महिलांबाबत सरकार काय निर्णय घेणार?

चारचाकी असली तर लाभ नाही!

राज्य सरकारने नुकताच नवा नियम लागू केला आहे. चारचाकी वाहन असलेल्या महिलांचे नाव माझी लाडकी बहीण योजनेतून (Mazi Ladki Bahin Yojana) वगळले जाणार आहे. अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी पाहणी करून चारचाकी असणाऱ्या महिलांची यादी तयार करत आहेत. त्यानंतर अशा लाभार्थ्यांचे नाव योजनेतून काढले जाईल.

🔴 हेही वाचा 👉 आता लगेच समजणार! लाडक्या बहिणीच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे का? हा मोठा निर्णय लवकरच….

ग्रामीण भागातून प्रश्न: मग दुचाकी चालणार का?

  • ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे जुन्या चारचाकी आहेत, ज्या व्यवसायासाठी किंवा अन्य कारणांसाठी वापरल्या जातात.
  • काही कुटुंबांकडे महागड्या बुलेटसारख्या 3-4 लाखांच्या दुचाकीही आहेत.
  • त्यामुळे चारचाकी वाहन असलेल्या महिलांना लाभ बंद, पण महागड्या दुचाकी असलेल्यांना लाभ सुरू राहणार का? ग्रामीण भागातुन असा सवाल केला जात आहे.

✅ जुन्या चारचाकी असतील, तर योजनेतून नाव काढले जाणार.
✅ लाखोंच्या महागड्या दुचाकीबाबत कोणताही निर्णय जाहीर नाही.
✅ ग्रामीण भागातून सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला जात आहे.

सरकार पुढे काय निर्णय घेणार?

ग्रामीण भागातुन या नियमाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकार आता महागड्या दुचाकी असलेल्या महिलांबाबत नवीन नियम आणणार का? याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.

🔴 हेही वाचा 👉 महिलांना दिलासा! मिळणार ₹2100? एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा.

Share This Article