अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पडताळणी, ‘या’ महिलांना आता मिळणार नाही फेब्रुवारीचा हफ्ता Ladki Bahin Yojana Four Wheeler Verification

2 Min Read
Ladki Bahin Yojana Four Wheeler Verification 2025

मुंबई: 4 फेब्रुवारी 2025: Ladki Bahin Yojana Four Wheeler Verification – महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या घरात चारचाकी वाहन आढळल्यास त्यांना थेट अपात्र करण्यात येणार आहे. राज्य सरकारने पात्र आणि गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरु केली आहे. (Ladki Bahin Yojana update! Women with a four-wheeler in the household will be ineligible. Anganwadi sevika to conduct home verification across Maharashtra.).

अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पडताळणी

महिला व बालकल्याण विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पडताळणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. 4 फेब्रुवारी 2025 पासून अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन चौकशी करतील. त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन आहे का याची लाभार्थी महिला तसेच त्या भागातील इतर रहिवाशांकडून माहिती घेतील. लाभार्थी महिलेच्या घरातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन असल्याचे आढळून आल्यास त्या महिलांना योजनेतून अपात्र ठरवले जाणार आहे.

चारचाकी वाहन असल्यास लाभ रद्द

महिला व बालविकास मंत्रालयातील डॉ. अनुप कुमार यादव यांनी 3 फेब्रुवारीला अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक घेतली. यामध्ये चारचाकी वाहनधारक लाभार्थींना अपात्र करण्याचे निर्देश देण्यात आले. परिवहन विभागाने वाहनधारकांची यादी तयार केली असून ती जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेचे निकष:

✔️ महिलांचे वय 18 ते 65 वर्षांदरम्यान असावे.
✔️ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे.
✔️ कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा आणि आयकरदाता नसावा.
✔️ इतर शासकीय योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
✔️ चारचाकी वाहन असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

विभक्त राहणाऱ्या महिलांना सवलत

जर लाभार्थी महिला पती किंवा मुलांसोबत वेगळी राहत असेल आणि घरातील इतर सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन असेल, तर त्या महिलांना योजनेचा लाभ मिळत राहील. मात्र, हे योग्य पुराव्यांच्या आधारे सिद्ध करावे लागेल.

अपात्र महिलांवर कडक कारवाई होणार

महिला व बालकल्याण विभागाने अपात्र महिलांना स्वतःहून योजना सोडण्याचे आवाहन केले होते. मात्र, अनेक महिलांनी लाभ घेण्याचे सुरूच ठेवल्याने सरकारने आता कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींसाठी अजून एक योजना; औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यावर भर.

Share This Article