लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, आता मिळणार याही योजनेचा लाभ Ladki Bahin Yojana Breaking News

2 Min Read
Ladki Bahin Yojana Free Gas Cylinder Benefit

Ladki Bahin Yojana Free Gas Cylinder Benefit: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) आता पात्र महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेचा उद्देश महिलांना धुरापासून मुक्ती आणि घरगुती खर्चात दिलासा देणे आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मोठा फायदा

राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना (Mukhyamantri Annapurna Yojana 2025) सुरू केली आहे. याअंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. यामुळे स्वयंपाकासाठी गॅसच्या वाढत्या किमतीची चिंता लाडक्या बहिणींना आता भासणार नाही.

  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरवर्षी तीन वेळा मोफत गॅस सिलिंडर मिळेल.
  • गॅस जोडणी लाभार्थी महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे.
  • लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
  • एका कुटुंबातील फक्त एक व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल.

केवायसी अनिवार्य, महिलांनी त्वरित पूर्ण करावी प्रक्रिया

Ladki Bahin Yojana Breaking News : सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. मोफत गॅस सिलेंडरचा (Free Gas Cylinder 2025) लाभ मिळवण्यासाठी महिलांनी आपली गॅस जोडणी स्वतःच्या नावावर करणे आवश्यक आहे.

गॅससाठी होणारा खर्च कमी, महिलांना दिलासा

अनेक गरीब कुटुंबांना गॅस सिलेंडरच्या किंमतींमुळे आर्थिक अडचणी येतात. परिणामी, काही महिलांना चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. परंतु सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लाडकी बहीण आणि अन्नपूर्णा योजनांचा दुहेरी लाभ

Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi : राज्यातील करोडो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केली आहे. आता यातील अनेक महिलांना अन्नपूर्णा योजनेचा (Annapurna Yojana) देखील लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा (Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra) लाभ घण्यासाठी महिलांनी त्वरित केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

Share This Article