Ladki Bahin Yojana 2100 Rupees Eknath Shinde Announcement: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेमुळे मोठ यश मिळाल होत. एकनाथ शिंदे यांनी नुकतच लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केल आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ वाढवला जाणार
Ladki Bahin Yojana News Today Marathi: लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना सध्या दर महिन्याला मिळणारा 1500 रुपयांचा हप्ता वाढवून लवकरच 2100 रुपये करण्यात येणार आहे. याशिवाय, विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज त्वरित मंजूर केले, ज्यामुळे काही महिलांना अर्जात त्रुटी असतानाही पैसे दिले गेले. मात्र, निवडणुकीनंतर अर्जांची पुन्हा पडताळणी करून अर्जांमध्ये त्रुटी असतील, किंवा ज्या महिला अपात्र असतील अशा महिलांचे अर्ज रद्द केले जातील.
🔴 हेही वाचा 👉 काल किती लाडक्या बहिणींना मिळाला जानेवारी महिन्याचा लाभ? तर, आज किती बहिणींना मिळणार.
महायुतीच्या विजयावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या विजयावर समाधान व्यक्त करत सांगितले की, “अंबाबाईच्या कृपेने महायुतीला अत्युत्तम विजय मिळाला. आता, सरकार येताच बंद पडलेल्या सर्व योजना (Sarkari Yojana Maharashtra 2025) पुन्हा सुरु केल्या जातील.”
पात्र लाडक्या बहिणींचा हप्ता कायम
एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, माझी लाडकी बहिण योजनेसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) ज्या महिला पात्र आहेत, त्यांना हप्ता देण्यात कधीही खंड पडणार नाही. पात्र महिलांचे अर्ज बाद केले जाणार नाहीत, आणि फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता (Ladki Bahin Yojana 8th Installment Date) जमा करण्यास विलंब होणार नाही. अस आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिल आहे.
🔴 हेही वाचा 👉 Free Silai Machine Yojana Maharashtra 2025.