Ladki Bahin Yojana Industrial Empowerment Maharashtra : राज्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी राज्यात ‘अस्मिता भवन’ उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
अस्मिता भवनाच्या माध्यमातून राज्यातील महिलांना व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे. महिला बचत गटांना या योजनेतून फायदा होणार आहे.
तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारले जात आहेत. विशेषत: बाजारपेठ असलेल्या भागात हे भवन उभारले जातील. यामुळे महिलांना रोजगार व व्यवसायाच्या अधिक संधी मिळतील.
अदिती तटकरे यांनी योजनेसंदर्भातील एक आणखी महत्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, महिलांसाठी ‘नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प’ राबवला जाणार आहे. या प्रकल्पामुळे महिलांना शेती, शेतीसंलग्न उद्योग तसेच बिगर शेती उद्योगांमध्ये नव्या संधी मिळतील.
तसेच, गारमेंट उद्योगासाठी रोहा येथील प्रकल्प कार्यान्वित करण्यात येईल. महिलांना या प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यासाठी योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाईल.
महिला व बालविकास मंत्रालयाने बालकांसाठी सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यस्तरीय बाल महोत्सव आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये साहित्यिक बालकांसाठी विशेष व्यासपीठ उपलब्ध करणार आहे.
अर्थात, अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली महिला व बालकल्याण विभागाकडून महिलांसाठी विविध योजनांवर लक्ष केंद्रित करून राज्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी विविध पाऊले उचलली जात आहेत. महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकार सुसंगत धोरण राबवत आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींमध्ये अर्ज मागे घेण्याचा नवा ट्रेंड.