Ladki Bahin Yojana 7th Installment: 26 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 जमा, फेब्रुवारी हप्त्याबाबत नियोजन सुरू

3 Min Read
Ladki Bahin Yojana January February Installment Update

Ladki Bahin Yojana 7th Installment Date Maharashtra: लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हफ्ता अजून जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी जानेवारी महिन्याचा हफ्ता (Ladli Behna Yojana January Installment Date Maharashtra) जमा होण्याची तारीख जाहीर केली व त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत (Ladki Bahin Yojana February Installment) नियोजन सुरू असल्याच अदिती तटकरे यांनी संगीतल.

मुंबई – महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वपूर्ण घोषणा (Ladki Bahin Yojana New Announcement ) केली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता 26 जानेवारीच्या आत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट जमा केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी आर्थिक नियोजन विभागाकडून 3690 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

Ladki Bahin Yojana January February Installment Update: डिसेंबर महिन्याचा हप्ता 24 ते 30 डिसेंबरदरम्यान वितरित करण्यात आला होता. आता जानेवारी महिन्याचा हप्ता प्रजासत्ताक दिनाच्या (26 January 2025) आधी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या संदर्भात अदिती तटकरे यांनी सांगितले की, “26 जानेवारीपूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल. तीन ते चार दिवसांत सर्व पात्र महिलांच्या खात्यात रक्कम पोहोचेल.”

फेब्रुवारी हप्त्याबाबत नियोजन सुरू

फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी सुद्धा (Ladki Bahin Yojana 8th Installment) आत्तापासूनच नियोजन सुरू केल असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले. प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवर पोहोचवण्यासाठी महिला व बालविकास विभाग विशेष लक्ष देत आहे. अर्थसंकल्पानंतर महिलांना वाढीव रक्कम मिळू शकते अस अदिती तटकरे म्हणाल्या.

तक्रारींचे निराकरण आणि पात्रता तपासणी

काही महिलांनी योजनेचा लाभ स्वतःहून सोडल्याचे समोर आले आहे. तसेच दुबार नोंदणी, उत्पन्नाची मर्यादा ओलांडणे, किंवा अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या काही महिलांचे नाव यादीतून काढण्यात आले आहे. मात्र, जानेवारी महिन्यातील लाभार्थ्यांची संख्या जवळपास 2.47 कोटी कायम राहील, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

महायुती सरकारने जुलै 2024 मध्ये ही योजना सुरू केली होती. आतापर्यंत महिलांना सहा हप्त्यांचे 9,000 रुपये मिळाले आहेत. या महिन्यातील 1,500 रुपयांचा हप्ता मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना एकूण मिळालेली रक्कम 10,500 रुपये इतकी होईल.

आदिती तटकरे म्हणाल्या, “महिला सशक्तीकरण आणि कल्याणासाठी सरकारने ही योजना सुरु केली आहे. अधिकाधिक महिलांना लाभ मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

  • डिसेंबर हप्ता: 24-30 डिसेंबर 2024
  • जानेवारी हप्ता: 26 जानेवारी 2025 च्या आत

🔥 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींसाठी ३,६९० कोटींचा निधी मंजूर, ‘इतक्या’ महिलांना मिळणार जानेवारीच्या हप्त्याचा लाभ.

लाडकी बहीण योजनेचा हफ्ता (Ladki Bahin Yojana Installment) वेळेत जमा होण्यासाठी पात्र महिलांनी आधार बँक खात्याशी लिंक केलेले असणे गरजेचे आहे.

🔥 हेही वाचा 👉 नागरिकांना ९९% शासकीय सेवा मोबाईलवर उपलब्ध होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा.

Share This Article