Ladki Bahin Yojana Latest Update : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून सांगण्यात आले की, योजनेत उघडकीस आलेल्या गैरप्रकारांमुळे पात्रता नियम आणखी काटेकोर केले जातील. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबतही महिलांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
काय असतील संभाव्य बदल?
निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) लागू करताना लाभार्थ्यांची नीट छाननी करण्यात आली नव्हती. त्यामुळे ज्या कुटुंबांमध्ये आयकरदाते, चारचाकी वाहनधारक किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला आहेत, त्यांच्याही खात्यात पैसे जमा झाल्याचे आढळून आले आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी स्पष्ट केले आहे की, ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना योजनेतून वगळले जाणार आहे. तसेच, संजय गांधी निराधार योजना किंवा अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुबार लाभ मिळणार नाही.
फेब्रुवारी महिन्यात १५०० की २१०० रुपये?
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ₹१५०० मिळेल की ₹२१००, याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. योजनेतुन मिळणारी आर्थिक मदत ₹१५०० वरून ₹२१०० करण्यात येणार आहे. मात्र, याच्या अंमलबजावणीचा निर्णय अद्याप सरकारने घेतलेला नाही. मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतरच महिलांना दरमहा २१०० रुपये दिले जातील.
🔴 हेही वाचा 👉 २१०० रुपये हफ्त्याचा निर्णय नेमका कधी?.
अद्याप कोणत्या महिला वंचित?
लाडकी बहीण योजनेच्या जुलै ते जानेवारीपर्यंतच्या सात हप्त्यांमध्ये एकूण १०,५०० रुपयांचे वितरण झाले आहे. मात्र, अनेक पात्र महिलांच्या खात्यात तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा झालेले नाहीत. यासाठी शासन लाडकी बहीण योजनेचे पोर्टल पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे.
✅ फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.
🔴 नोकरी 👉 RBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! कोणतीही लेखी परीक्षा नाही.