मुंबई, 6 फेब्रुवारी 2025: Ladki Bahin Yojana Maharashtra Financial Crisis – नुकतच राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’च्या प्रसिद्धीसाठी 3 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. आर्थिक संकटामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भर येत आहे, आणि यामुळे अनेक लोकप्रिय सरकारी योजनांना (Sarkari Yojana Maharashtra) ब्रेक लागण्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. या योजनेमुळेच महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठ यश मिळाल. योजनेद्वारे महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात, आणि आतापर्यंत 7 हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी 5 हप्ते आणि निवडणुकीनंतर 2 हप्ते महिलांना देण्यात आले.
मात्र, राज्याच्या वित्तीय तुटीमुळे शिवभोजन आणि आनंदाचा शिधा यासारख्या लोकप्रिय योजनांवर ब्रेक लागण्याची चर्चा आहे. वित्तीय संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकार कडक पावले उचलण्याचा विचार करत आहे. तथापि, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सरकारने 3 कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला आहे, आणि या खर्चाने योजनेचा सोशल आणि डिजिटल माध्यमांद्वारे प्रचार केला जाणार आहे.
महिला आणि बालविकास विभागाने योजनेच्या प्रचारासाठी 200 कोटी रुपयांच्या माध्यम आराखड्याला मान्यता दिली होती. आता लाडकी बहीण योजनेच्या सोशल मीडिया, टेलिव्हिजन आणि रेडिओवरील जाहिरातीसाठी 3 कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे.
🔴 हेही वाचा 👉 ✔️ ‘या’ देशांकडे आहे सर्वाधिक सोन्याचा साठा; यात भारत 🇮🇳 कितव्या स्थानी? जाणून घ्या….
राज्यात अनेक योजना सुरू आहेत, आणि त्यांच्या खर्चावरही चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपये खर्च केले जातात. त्याचबरोबर, मुलींना मोफत उच्च शिक्षण, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, आणि अन्य योजनांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर खर्च होतो.
राज्याच्या तिजोरीत असलेल्या ताणामुळे या योजनांचा खर्च जुळवणे सरकारसाठी कठीण होईल, अस बोलल जात आहे. त्यामुळे राज्यातील आर्थिक परिस्थितीचा परिणाम अनेक योजनांवर होऊ शकतो.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजना नवीन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु? महायुतीच्या नेत्याचा खुलासा.
राज्य सरकारने 200 कोटी रुपयांच्या माध्यम आराखड्यास मान्यता दिली होती. याअंतर्गत 3 कोटी रुपयांचा खर्च लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी मंजूर करण्यात आला आहे.
राज्याच्या अर्थव्यवस्थेवर येत असलेल्या अतिरिक्त भारामुळे अनेक योजनांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे. अशातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) प्रचार करण्यासाठी सरकारने मोठ्या खर्चाला मंजूरी दिली आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेच्या नवीन ‘माध्यम योजनेला’ मंजुरी, सरकारचा निर्णय.