Ladki Bahin Yojana New Registration Update : सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांची तपासणी सुरू केली आहे. या योजनेतुन महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. परंतु, योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र महिलांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.
तपासणी अंतर्गत, 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व चारचाकी वाहन असलेल्या महिलांची तपासणी केली जात आहे. अशा महिलांकडून दिलेले पैसे परत घेतले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. यावर महायुतीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठ वक्तव्य केल आहे.
त्यांनी स्पष्ट केल की, चारचाकी वाहन असलेल्या महिलांना मदतीची आवश्यकता नसल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. पण आत्तापर्यंत दिलेले पैसे परत घेण्याला काहीच अर्थ नाही अस ते म्हणाले. लाडकी बहीण योजनेचा उद्देश गरीब महिलांना मदत करणे आहे, विशेषत: घरकाम आणि शेती करणाऱ्या महिलांना. त्यामुळे घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलांना इथून पुढे लाभ मिळणार नाही.
Ladki Bahin Yojana New Registration: भुजबळ म्हणाले की, योजनेच्या नियमांची लवकरच जाहिरात करण्यात येईल. टीव्ही आणि वर्तमानपत्रांत याची माहिती दिली जाईल, अस ते म्हणाले. यामुळे महिलांना योजनेबद्दल अधिक माहिती मिळेल आणि योग्य पात्रता असलेल्या नवीन महिलांना योजनेचा लाभ घेता येईल.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेच्या नवीन ‘माध्यम योजनेला’ मंजुरी, सरकारचा निर्णय.
सध्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. महायुती सरकारने योजनेच्या वाढीव रकमेच्या संदर्भात आश्वासन दिले आहे की लवकरच महिलांना २१०० रुपये दिले जातील. परंतु, त्यासाठीची निश्चित तारीख अद्याप समोर आलेली नाही.
🔴 सरकारी नोकरी 👉 10वी, 12वी पासांसाठी सर्वात मोठी भरती, 1.10 लाख रुपये पर्यंत पगार! अर्ज सुरू.