Ladki Bahin Yojana New Rules Eligibility Update 2025 : राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने काही लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. प्राप्तिकर विभागाच्या मदतीने लाभार्थ्यांचे उत्पन्न तपासले जाणार आहे. तसेच, इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असल्यास त्याचीही तपासणी होणार आहे.
कोणत्या महिलांना योजनेतून वगळले जाणार?
कुटुंबकचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त असलेल्या कुटुंबांतील महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळले जाणार आहे. यामुळे अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
- दरवर्षी जून महिन्यात लाभार्थींनी आपली आर्थिक माहिती द्यावी लागेल.
- ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आली आहे.
- लाभार्थी महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहे का याची माहिती दरवर्षी तपासली जाईल.
लाखो महिला ठरल्या अपात्र
माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) आतापर्यंत 2 कोटी 63 लाख महिलांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या होत्या. मात्र, गेल्या आठवड्यात 5 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
सरकारचा खर्च आणि पुढील योजना
गेल्या 7 महिन्यांत सरकारने तब्बल ₹25,250 कोटी योजनेसाठी खर्च केले आहेत. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने काही नियम कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.
महिलांनी योग्य प्रकारे योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनी वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांना योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे.