मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बदल, अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण Ladki Bahin Yojana New Update Today

2 Min Read
Ladki Bahin Yojana New Update Today 28 January 2025

Ladki Bahin Yojana News Maharashtra: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी दिलासा देणारी योजना ठरली आहे. राज्यातील 2.41 कोटींहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याचा (जानेवारी महिन्याचा) लाभ मिळाला आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने 3690 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.

महिलांना 1500 रुपयांचा थेट लाभ

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात आले आहेत. ही रक्कम 25 जानेवारीपासून थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली.

मंत्री तटकरे यांचे अफवांवर स्पष्टीकरण

सध्या लाडकी बहीण योजनेबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या आहेत. काही ठिकाणी असा दावा केला जात आहे की, सरकारने योजनेच्या नियमांमध्ये बदल केले असून, काही महिलांना अपात्र ठरवून त्यांच्याकडून योजनेची रक्कम वसुल केली जाईल. यासंदर्भात मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

2024 मध्ये महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरू केली होती. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. आतापर्यंत पात्र महिलांना सात हप्त्यांमध्ये एकूण 10,500 रुपये दिले गेले आहेत.

🔴 हेही वाचा 👉 आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत 1500 रुपये, जाणून घ्या सविस्तर.

वेरिफिकेशन प्रक्रियेबाबत माहिती

महिला व बालविकास विभाग सध्या अनेक सरकारी योजनांचे लाभार्थी वेरिफिकेशन करत आहे. मात्र, अद्याप कोणत्याही लाभार्थी महिलांना अपात्र ठरवून त्यांच्याकडून पैसे वसुल करण्याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सरकारने केले आहे.

🔥 लेटेस्ट अपडेट 👉 लाडक्या बहिणींची पात्रतेसाठी पाच ठराविक निकषांवर आधारित छाननी जाहीर – अदिती तटकरे.

🔴 हेही वाचा 👉 या योजनेतून मिळते महिलांना मोफत स्कूटी? जाणून घ्या सविस्तर माहिती.

Share This Article