Ladki Bahin Yojana Payment Status Update 2025 : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 24 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान सातव्या हप्त्याचे पैसे जमा केले आहेत. मात्र, अनेक महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत. शासनाने पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली असून, लाभ मिळण्यासाठी नाव यादीत आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे.
यादीत नाव तपासण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा:
- महानगरपालिका/जिल्हाधिकारी वेबसाइटला भेट द्या:
- सर्वप्रथम गुगलवर [तुमच्या जिल्ह्याचे नाव] महानगरपालिका लाभार्थी यादी असे सर्च करा.
- संबंधित अधिकृत वेबसाइट उघडा.
- लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी शोधा:
- पेजवर “माझी लाडकी बहीण – लाभार्थी यादी” हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन पेजवर यादी डाउनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
- यादी डाउनलोड करून तपासा:
- डाउनलोड केलेल्या यादीत अर्ज क्रमांक, नाव, मोबाईल नंबर आणि अर्जाची स्थिती पाहता येईल.
- तुमचा अर्ज क्रमांक किंवा नाव शोधून खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तपासा.
तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत? हे करा:
- जर तुमचे नाव यादीत नसेल, तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
- ऑनलाईन यादी सापडली नाही, तर जिल्ह्यातील अधिकृत कार्यालयात किंवा नियुक्त अधिकाऱ्यांकडे चौकशी करा.
- काही तांत्रिक अडचणीमुळे उशीर होत असल्यास, बँकेशी किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा.
जर तुमच्या खात्यात अद्याप लाडकी बहीण योजनेचे पैसे (Ladki Bahin Yojana Payment) जमा झाले नसतील, तर वरील स्टेप्स फॉलो करा आणि तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे का हे त्वरित तपासा!
🔴 हेही वाचा 👉 फेब्रुवारीतच महिलांना मिळणार १५०० ऐवजी २१०० रुपये? जाणून घ्या सविस्तर.