Ladki Bahin Yojana Refund Update Maharashtra : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना सरकारकडून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शासनाने लाभार्थी महिलांच्या अर्जाची तपासणी सुरू केली आहे. तपासणीत अपात्र ठरणाऱ्या महिलांना आतापर्यंत जमा झालेली रक्कम म्हणजेच ₹10,500 सरकारला परत करावी लागतील अशी चर्चा सुरु झाली आहे.
सरकारकडून अर्जांची कसून तपासणी सुरू
महिला व बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अर्ज छाननीला गती दिली आहे. सरकार याकरिता आयकर आणि परिवहन विभागाची मदत घेत आहे.
- आयकर विभाग – महिलांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती तपासणार.
- परिवहन विभाग – संबंधित महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे का, हे पडताळणार.
अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार
सरकार अंगणवाडी सेविकांना घराघरात पाठवणार आहे. लाभार्थीं अपात्र ठरले, तर आतापर्यंत जमा झालेले ₹10,500 परत करावे लागतील.
🔴 हेही वाचा 👉 अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पडताळणी, ‘या’ महिलांना आता मिळणार नाही फेब्रुवारीचा हफ्ता.
या महिलांना योजनेतून वगळले जाईल
ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे, त्या महिलांना माझी लाडकी बहीण योजनेतून (Mazi Ladki Bahin Yojana) वगळले जाणार आहे. मात्र, सासरे, दीर किंवा इतर नातेवाईकांच्या नावावर वाहन असल्यास आणि लाभार्थी महिला स्वतंत्र राहत असल्यास, त्यांना योजनेचा लाभ सुरूच राहील.
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता?
जुलै 2024 पासून सरकारने महिलांच्या खात्यात दरमहा ₹1,500 जमा करायला सुरुवात केली. आतापर्यंत सात हप्ते मिळाले असून, एकूण ₹10,500 जमा झाले आहेत. पुढचा हप्ता 15 फेब्रुवारी नंतर जमा होण्याची शक्यता आहे. पण जर अर्ज अपात्र ठरला, तर संपूर्ण रक्कम सरकारला परत करावी लागू शकते.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेच्या नियमांच टीव्हीवर प्रसारण.
लाभार्थी महिलांनी काय करावे?
लाभार्थींनी सरकारकडून वेळोवेळी जाहीर केल्या जाणाऱ्या सूचना जाणून घ्याव्यात. अपात्र असल्यास स्वतःहून योजनेचा लाभ नाकारल्यास पैसे परत करावे लागत नाहीत.
🔴 नोकरी 👉 भारतीय रेल्वेत 32,000 पदांची मेगा भरती, ही आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख.