Ladki Bahin Yojana Scam Fake Applications Exposed Maharashtra : महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानातील महिलांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून अर्ज भरून योजनेचा लाभ घेतला आहे.
🔹 परप्रांतीय महिलांचे बोगस अर्ज उघड
लातूर, सांगली जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविकांच्या नावाने १,१७१ बनावट अर्ज भरले गेले. प्रत्यक्ष चौकशीत या महिलांचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नसल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एका गावात मुस्लिम महिलांचे अर्ज सापडले, मात्र त्या गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही!
🔹 लॉगिन आयडीचा गैरवापर
सरकारी वेबसाईटवरील लॉगिन आयडीचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात अर्ज भरले गेले. सांगलीच्या ‘मुनमुन ठाकरे’ आणि लातूरच्या ‘अनवरा बेगम’ या नावाने १,१७१ बनावट अर्ज सादर झाले. चौकशीत ही नावे पूर्णपणे फेक असल्याचे स्पष्ट झाले.
🔹 नकली आधार कार्ड आणि अस्पष्ट कागदपत्रांचा गैरवापर
फसव्या अर्जांमध्ये नकली आधार कार्ड आणि कागदपत्रांचा अस्पष्ट प्रती अपलोड करण्यात आल्या, त्यामुळे पडताळणी प्रक्रिया क्लिष्ट झाली. याचाच फायदा घेत परप्रांतीय ठगांनी महाराष्ट्र सरकारची लाखोंची फसवणूक केली.
🔹 सरकारकडून मोठी कारवाई सुरू
महिला व बालविकास विभाग, पोलीस आणि महसूल विभाग मिळून संपूर्ण घोटाळ्याचा तपास करत आहेत. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेल्या या महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून अटक प्रक्रिया सुरू आहे.
🔥 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठे आरोप, 7 फेब्रुवारीला हायकोर्टात सुनावणी.
🛑 राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेत (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Application Process 2025) मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या प्रकारानंतर इतर योजनांमध्येही अशीच फसवणूक झाली आहे का, याचा तपास होणार आहे.
🔥 हेही वाचा 👉 फेब्रुवारीतच महिलांना मिळणार १५०० ऐवजी २१०० रुपये? जाणून घ्या सविस्तर.