Ladki Bahin Yojana: आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी बंद होणार? लाडकी बहीण योजनेमुळे अन्य योजनांना फटका!

2 Min Read
Ladki Bahin Yojana Shiv Bhojan Thali Anandacha Shidha Update

Ladki Bahin Yojana Shiv Bhojan Thali Anandacha Shidha Update: राज्यातील गरीब आणि गरजूंसाठी सुरु असलेल्या आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी या योजनांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेसाठी सरकारवर मोठा आर्थिक भार पडत असल्याने, अन्य काही योजनांवर सरकारला खर्च कमी करावा लागणार आहे. त्यामुळे आनंदाचा शिधा योजना आणि शिवभोजन थाळी बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Ladki Bahin Yojana’s financial burden may impact Maharashtra’s food schemes like Shiv Bhojan Thali & Anandacha Shidha. Will these schemes be discontinued? Read the latest update).

लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांना फटका?

राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी सुमारे 50,000 कोटी रुपये खर्च केला जात आहे. सरकारने ही योजना बंद करण्याऐवजी तिच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या वाढणाऱ्या आर्थिक भारामुळे इतर योजनांवर कात्री मारण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती समोर येत आहे.

आनंदाचा शिधा योजना बंद होणार?

आनंदाचा शिधा योजना ही राज्यातील गरीब कुटुंबांसाठी सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत, गरजू नागरिकांना 100 रुपयांत 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल देण्यात येत होते. मात्र, आता ही योजना बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवभोजन थाळीवर संकट?

राज्यातील गरीब आणि कष्टकरी लोकांना 10 रुपयांत पोटभर जेवण मिळावे यासाठी 2020 मध्ये शिवभोजन थाळी योजना सुरु करण्यात आली होती. या थाळीमध्ये 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 वाटी भात आणि 1 वाटी वरण दिले जाते. मात्र, लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक भारामुळे ही योजना बंद करण्याचा विचार सरकार करत असल्याचे बोलले जात आहे.

सरकार काय निर्णय घेणार?

अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या काही योजनांवर सरकारला खर्च मर्यादित करावा लागणार आहे. त्यामुळे गरीब आणि गरजूंसाठी महत्त्वाच्या योजना बंद होणार का? याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांना फटका बसणार का? सरकार यावर काय भूमिका घेणार? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

🔴 हेही वाचा 👉 छगन भुजबळ यांचे लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्ट मत, योजनेचे पैसे परत घेण्यात अर्थ नाही.

Share This Article