Latur Ladki Bahin Yojana Arj Bad : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत, लातूर जिल्ह्यातील २५ हजार १३६ लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. योजनेच्या प्रारंभात राज्यभरातील महिलांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळाला होता, मात्र आता योजना अधिक पारदर्शकतेने राबवली जात आहे.
महाराष्ट्र सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) या योजनेअंतर्गत केलेल्या छाननीमध्ये लातूर जिल्ह्यातील २५,१३६ अर्ज रद्द करण्यात आले आहेत. योजनेच्या अटींचे काटेकोरपणे पालन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी यावर स्पष्टीकरण देताना, “ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही,” असे स्पष्ट केले.
Latur News : विधानसभा निवडणुकांच्या अगोदर माझी लाडकी बहीण योजनेचा (Mazi Ladki Bahin Yojana) मोठा गाजावाजा झाला होता. योजनेच्या सुरुवातीला लातूर जिल्ह्यातील ५ लाखाहून अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळाला, परंतु निवडणुकांनंतर या योजनेत अधिक पारदर्शकता आणली जात आहे. अर्ज छाननीमध्ये कागदपत्रांमध्ये छेडछाड, खोटी माहिती, बनावट कागदपत्र, अडीच लाखांपेक्षा आणि अधिक उत्पन्न असणाऱ्या महिलांच्या अर्जांची शहानिशा करण्यात आली, ज्यामुळे २५ हजार १३६ अर्ज रद्द केले आहेत.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत? काय करावे….
महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये आर्थिक मदत देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेत पारदर्शकतेची आवश्यकता असल्याने आता लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. काही लाभार्थी ८व्या हफ्त्याबाबत (Ladki Bahin Yojana 8th Installment) प्रश्न उपस्थित करत आहेत, ज्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरत आहे.
🔴 हेही वाचा 👉 5000 महिलांना लवकरच मिळणार पिंक ई-रिक्षा; अदिती तटकरे यांची मोठी घोषणा.