Maharashtra Police Recruitment 2025 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे! राज्यात 10,000 पदांसाठी ‘महाराष्ट्र पोलिस भरती 2025’ प्रक्रिया सुरू होणार आहे. मार्च 2025 पर्यंत रिक्त होणारी पदेदेखील या भरतीत भरली जाणार आहेत. पोलिस दलात भरती होण्याची संधी मिळणार असल्याने अनेक उमेदवारांचे सरकारी नोकरीचे (Sarkari Naukri Maharashtra) स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र पोलिस भरती 2025 प्रक्रिया कधी सुरू होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2025 पर्यंत भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते. लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने ही पोलिस भरती 2025 जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
भरती प्रक्रियेत कोणते टप्पे असतील?
पोलिस भरतीसाठी उमेदवारांना काही आवश्यक पात्रता पूर्ण करावी लागेल. भरती प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडेल:
- शारीरिक चाचणी (Physical Test):
- पुरुष उमेदवारांसाठी उंची – 165 सेमी
- महिला उमेदवारांसाठी उंची – 155 सेमी
- धावणे, लांब उडी, उंच उडी यासारख्या शारीरिक चाचण्या
- लेखी परीक्षा (Written Exam):
- सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, मराठी आणि इंग्रजी विषयांवर प्रश्न
- मुलाखत (Interview):
- अंतिम निवडीसाठी महत्त्वाची प्रक्रिया
अर्ज कसा करावा?
- अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
- पोलीस भरती 2025 अर्ज लिंक ओपन करा.
- आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट करून प्रिंटआउट घ्या.
लवकरच ‘Maharashtra Police Bharti 2025 Recruitment’ जाहिरात प्रसिद्ध होईल त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांनी अभ्यास सुरू ठेवा. महाराष्ट्र पोलिस दलात सामील होण्याची ही सुवर्णसंधी गमावू नका!