Ladki Bahin Yojana News : लाडक्या बहिणींसाठी ही आहे सर्वात ताजी अपडेट!

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana 8th Instalment Date Update

Majhi Ladki Bahin Yojana 8th Instalment Date Update : महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या ८व्या हप्त्याचे पैसे (Ladki Bahin Yojana February Instalment) लवकरच खात्यात जमा होणार आहेत.

८वा हप्ता कधी मिळणार?

मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हप्ता जमा केला जाईल. राज्यातील करोडो लाभार्थि महिला खात्यात पैसे जमा होण्याची वाट पाहत आहेत. सरकारी अहवालानुसार, १५ फेब्रुवारीपर्यंत हप्ता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे योजनेतील लाभार्थी महिलांनी आपले बँक खाते ई केवायासी केल्याची आणि DBT सक्रिय असल्याची वेळीच खात्री करणे गरजेचे आहे.

ही कागदपत्रे योग्य नसतील तर हप्ता मिळणार नाही

लाडकी बहिण योजनेच्या ८व्या हप्त्यासाठी महिलांची कागदपत्रे योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळली, तर हप्ता अडकण्याची शक्यता आहे. खाते क्रमांक चुकीचा असल्यास किंवा DBT (Direct Benefit Transfer) सेवा बंद असेल, तर हप्ता खात्यात जमा होणार नाही.

अपात्र महिलांची नावे वगळ्यनात आली

नुकतच सरकारने काही अपात्र महिलांची नावे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून (Ladki Bahin Yojana List February 2025) वगळली आहेत. जर तुमचे नाव यादीतून काढले गेले असेल, तर तुम्हाला पुढच्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, याची खात्री करणे गरजेचे आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेबाबत नवीन नियम; आता ‘या’ महिलांना मिळणार नाही लाभ!.

महत्वाचे – बँकेत जाऊन तपासा

  • बँकेत जाऊन खात्यात DBT सेवा सुरू आहे का, हे तपासा.
  • योजनेच्या अधिकृत वेबसाइट किंवा स्थानिक कार्यालयात संपर्क साधून तुमचे नाव यादीत आहे की नाही, हे जाणून घ्या.

लाडकी बहिण योजना – आतापर्यंत किती हप्ते मिळाले?

माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत (Mazi Ladki Bahin Yojana) आतापर्यंत ७ हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता ८वा हप्ता देण्याची तयारी सुरू आहे. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत घोषणेनुसार लवकरच हा हप्ता खात्यात जमा केला जाईल.

🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्रातील रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारचा मोठा निर्णय!.

Share This Article