मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) या योजनेअंतर्गत जानेवारी २०२५ महिन्याचा सन्मान निधी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे.
२४ जानेवारी २०२५ पर्यंत १.१० कोटी महिलांना लाभ
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जानेवारी २०२५ पर्यंत १.१० कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला आहे. आज २५ जानेवारी रोजी उर्वरित पात्र महिलांच्या खात्यातही निधी जमा केला जाणार आहे. आणि २६ जानेवारी २०२५ पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात निधी जमा होईल अस अदिती तटकरे म्हणाल्या.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्यामुळे महिला सक्षमीकरणास चालना मिळत आहे.
- या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे.
- योजनेचा सन्मान निधी वेळेवर जमा करण्यासाठी प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न सुरू आहेत.
लाभार्थींनी आपले बँक खाते तपासणे आवश्यक आहे. निधी जमा न झाल्यास किंवा इतर कोणत्याही अडचणी असल्यास महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी सरकारने अधिकृत हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे, जिथे महिलांना त्यांच्या शंकांचे निराकरण करता येईल.
🔴 हेही वाचा 👉 जानेवारीचा सातवा हप्ता जमा झाला की नाही ‘अस’ तपासा.