Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra Free Travel Scheme : महाराष्ट्र सरकारने गतवर्षी सुरू केलेली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आजही चर्चेचा विषय आहे. या योजनेअंतर्गत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील व राज्यातील प्रमुख तीर्थस्थळांचे मोफत दर्शन घेता येते.
गतवर्षी ५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिकांना अयोध्येला प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली होती. योजनेचे उद्दिष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा सामाजिक व धार्मिक दृष्टीने सशक्त करणे. या योजनेत देशातील १४ प्रमुख व महाराष्ट्रातील ९५ तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.
योजनेचे मुख्य फायदे
- मोफत प्रवास व निवास:
राज्य शासन सर्व खर्च उचलते. प्रवास, राहणे व खाण्याचा खर्च सरकार भरणार आहे. - मोफत तीर्थदर्शन:
ज्येष्ठ नागरिकांना निवडलेल्या तीर्थस्थळांवर मोफत दर्शनाची सोय उपलब्ध आहे. - आर्थिक मदत:
प्रत्येकी ३०,००० रुपये खर्च सरकार कडून केला जातो.
पात्रतेचे निकष काय आहेत?
- राज्याचा रहिवासी:
लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. - वयाची अट:
लाभार्थ्यांचे वय ६० वर्षे पूर्ण असणे आवश्यक. - कुटुंबाचे उत्पन्न:
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. - आवश्यक कागदपत्रे:
लाभार्थ्याने आधार कार्ड, रेशन कार्ड, राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, जन्म दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो आणि जवळच्या नातेवाइकाचा मोबाइल क्रमांक सादर करणे अनिवार्य आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाभार्थ्यांना दररोज ५०० रुपये देणारी सरकारी योजना, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्यासाठी जिल्ह्यातील सहायक आयुक्त कार्यालय व समाजकल्याण विभागाशी संपर्क साधावा. अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड व भरता येतो.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेद्वारे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थ दर्शनाचा लाभ देण्याचा हा उपक्रम फारच महत्वाचा आहे. या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिक सामाजिक व धार्मिक दृष्टिकोनातून सशक्त होतील आणि त्यांच्या जीवनात आनंदाचे नवे क्षण येतील.
🔴 हेही वाचा 👉 सुप्रीम कोर्टाचा मोफत योजना रोखण्याचा आदेश आला, लाडकी बहीण योजना बंद.