Namo Shetkari Yojana Beneficiary Status Check : महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान योजनेअंतर्गत (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे, मात्र अजूनही अनेक जण आपल्या लाभार्थी स्टेटसविषयी अनभिज्ञ आहेत. जर तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल, आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी स्टेटस तपासू इच्छित असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
नमो शेतकरी योजना काय आहे?
Namo Shetkari Yojana In Marathi : नमो शेतकरी महा सन्मान योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) धर्तीवर राबवली जाते. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये अतिरिक्त अनुदान दिले जाते. हा निधी सरकारच्या अधिकृत वेबसाईटद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जातो.
नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी स्टेटस ऑनलाइन कसे तपासावे?
जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का, हे तपासू इच्छित असाल, तर खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून लाभार्थी स्टेटस तपासू शकता.
नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी स्टेटस तपाण्याची प्रक्रिया:
- सर्वप्रथम https://nsmny.mahait.org/Beneficiary_Status/Beneficiary या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर “Beneficiary Status” या पर्यायावर क्लिक करा.
- येथे “नोंदणी क्रमांक” किंवा “मोबाईल क्रमांक” टाकून स्टेटस तपासा.
- जर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहिती नसेल, तर “Know Your Registration No” या पर्यायावर क्लिक करा.
- येथे मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका आणि “Get Data” वर क्लिक करा.
- मोबाईल क्रमांक टाकल्यास तुम्हाला एक OTP येईल. तो OTP आणि Captcha कोड टाकून पुढे जा.
- आता तुम्हाला तुमचे नाव, पत्ता आणि योजनेशी संबंधित सर्व माहिती दिसेल.
- यापूर्वी किती हफ्ते मिळाले आहेत आणि पुढील हफ्ता कधी मिळेल, याची संपूर्ण माहिती येथे उपलब्ध असेल.
🔴 हेही वाचा 👉 शेतकऱ्यांना २४ फेब्रुवारीला मिळणार पैसे, तुम्हाला मिळणार की नाही? येथे तपासा.
नमो शेतकरी योजनेचा लाभ कधी मिळतो?
- लाभार्थी पात्र ठरल्यानंतर हफ्त्यांची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते.
- योजनेचे सर्व अपडेट्स आणि लाभार्थी स्टेटस वेळोवेळी ऑनलाइन पोर्टलवर अपडेट केले जाते.
- काही शेतकऱ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे नाकारले जातात, त्यामुळे स्वतःचे स्टेटस नियमितपणे तपासणे गरजेचे आहे.
योजनेचा लाभ मिळत नसल्यास काय करावे?
जर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नसेल, तर खालील कारणे असू शकतात:
✔ अपूर्ण माहिती किंवा चुकीचा अर्ज
✔ बँक खात्याची समस्या
✔ पात्रता निकष पूर्ण न करणे
✔ कागदपत्र सत्यापन अपूर्ण असणे
नमो शेतकरी महा सन्मान योजनेसंदर्भात (Namo Shetkari Yojana 2025) अधिक माहितीसाठी तहसील कार्यालय किंवा कृषी विभागाच्या अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधावा.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजना अपात्र महिलांची यादी जाहीर – त्वरित तपासा आपले नाव.