Pink E Rickshaw Yojana: 5000 महिलांना लवकरच मिळणार पिंक ई-रिक्षा; अदिती तटकरे यांची मोठी घोषणा

2 Min Read
Pink E Rickshaw Yojana Maharashtra

Pink E Rickshaw Yojana Maharashtra : महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या पुढाकाराने महिलांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणारी पिंक ई-रिक्षा योजना (Pink E Rickshaw Yojana) लवकरच अमलात येणार आहे. या योजनेअंतर्गत 5000 महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप करण्यात येणार असून, यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची मोठी घोषणा


महिला व मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पिंक ई-रिक्षा योजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहेत.

त्यांनी स्पष्ट केले की, “महाराष्ट्रातील माता-भगिनींना सन्मानजनक रोजगाराची संधी मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नियोजनबद्ध पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी केली जाईल आणि लवकरच 5000 महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप केले जाईल.”

पिंक ई-रिक्षा योजनेचा उद्देश:

✅ महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे
✅ त्यांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण करणे
✅ महिला प्रवाशांसाठी सुरक्षित प्रवास सेवा निर्माण करणे

🔴 हेही वाचा 👉 1 फेब्रुवारी पासून सोन्याच्या किमती वाढणार? जाणून घ्या यामागच नेमक कारण.

महिला सशक्तीकरणासाठी मोठे पाऊल!

पिंक ई-रिक्षा योजना (Pink E Rickshaw Yojana Maharashtra) महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे. यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल, तसेच शहरांमध्ये महिलांसाठी अधिक सुरक्षित वाहतूक पर्याय उपलब्ध होतील.

🔴 हेही वाचा 👉 …तर मिळणार नाही मोफत गॅस सिलेंडर; जाणून घ्या अन्नपूर्णा योजनेचा हा नियम.

Share This Article