PM Kisan Yojana 19th Installment Date February 2025 : शेतकऱ्यांची PM Kisan योजनेच्या 19वी हप्त्याची प्रतीक्षा संपली!
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे.
19व्या हप्त्याची तारीख जाहीर
PM Kisan योजनेच्या 18व्या हप्त्याची रक्कम 15 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली होती. आता 19वी हप्त्याची रक्कम 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
PM Kisan Yojana या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम ₹2,000 च्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात DBT (Direct Benefit Transfer) माध्यमातून जमा केली जाते. आतापर्यंत 18 हप्ते यशस्वीपणे वितरित करण्यात आले आहेत.
कोण पात्र?
- अर्जदार शेतकरी असावा.
- शेतकऱ्याच्या कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळेल.
- अर्जदाराने इनकम टॅक्स भरलेला नसावा.
- सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही.
ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य
PM Kisan योजनेच्या पुढच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा हप्त्याची रक्कम रोखली जाऊ शकते. शेतकऱ्यांनी PM Kisan Yojana च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्वरित e-KYC अपडेट करावे.
अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर:
- टोल-फ्री क्रमांक: 155261 / 1800115526
- संपर्क क्रमांक: 011-23381092
- ईमेल: pmkisan-ict@gov.in
🔴 हेही वाचा 👉 मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना पुन्हा सुरू – अयोध्या दर्शनाची संधी! त्वरीत करा अर्ज.