PM Kisan Yojana 19th Installment Eligibility : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. PM किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असल्याची माहिती कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. यामुळे या दिवशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होतील.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल 19वा हप्ता?
PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचा लाभ फक्त तेच शेतकरी घेऊ शकतील ज्यांनी योजने संबंधित आवश्यक अटी पूर्ण केल्या आहेत. त्या अटी पुढीलप्रमाणे आहेत:
- ई-केवायसी पूर्ण केलेली असावी:
शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यांनी हे काम पूर्ण केले आहे त्यांनाच हप्त्याचा लाभ मिळेल. - आधार लिंकिंग अनिवार्य:
बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे. ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांचा हप्ता रोखला जाऊ शकतो. - भू सत्यापन पूर्ण:
शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे योग्य असल्यास आणि भू सत्यापन प्रक्रिया पूर्ण असल्यास हप्ता खात्यात जमा होईल.
🔴 लेटेस्ट अपडेट 👉 शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आता Farmer ID असल्याशिवाय मिळणार नाही PM किसान योजनेचा लाभ.
हप्त्याचा लाभ कसा मिळवावा?
जर तुम्ही वरील सर्व अटी पूर्ण केल्या असतील, तर तुम्हाला हप्त्याचा लाभ सहज मिळेल. जर ई-केवायसी, आधार लिंकिंग किंवा जमिनीचे सत्यापन प्रलंबित असेल, तर ते त्वरित पूर्ण करा.
शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती आणि कागदपत्रांची खात्री करून घ्यावी. अधिक माहितीसाठी पीएम किसान पोर्टलला भेट द्या.
🔴 हेही वाचा 👉 Farmer ID Registration Online Apply: राज्यातील ६ लाख शेतकऱ्यांना मिळाले फार्मर आयडी, अशी करा नोंदणी.